Join us

बचपन का प्यार...! ट्रेंडिंग गाण्यावर उमेश कामत व प्रिया बापटची धम्माल मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 11:12 IST

अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे एक क्युट कपल म्हणून ओळखलं जातं. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता या जोडप्यानं एक धम्माल व्हिडीओ शेअर केला आहे

ठळक मुद्देसहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया आणि उमेश लग्नबेडीत अडकले होते. प्रिया बापट आणि उमेश कामत हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने एकमेकांचे खूप अगोदरपासून चांगले मित्र होते.

मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) आणि अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) हे एक क्युट कपल म्हणून ओळखलं जातं. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता या जोडप्यानं एक धम्माल व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यांचा हा धम्माल व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेल्या ‘बचपन का प्यार’ या गाण्यावर उमेश व प्रियानं भन्नाट डान्स केला आहे.   व्हिडीओत उमेशनं ब्लेझर परिधान केल्याचं पाहायला मिळतंय. तर प्रिया देखील रेड ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय. ‘बचपन का प्यार’ या गाण्यावर दोघांचीही ही धम्माल मस्ती पाहण्यासारखी आहे.

 बचपन का प्यार आणि काय हवं ?  असं कॅप्शन देत उमेशनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या या व्हिडीओवर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडतोय. गेल्या काही तासात 37 हजारांवर लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.अनेक मराठमोळ्या सेलिब्रिटींनीही या व्हिडीओला पसंती देत कमेंट्स केल्या आहेत.  अरे बापरे ..मला विश्वास बसत नाहिय तुम्ही लोकांनी हे केलं..., असं म्हणत अमृता खानविलकरनं  हसणारे इमोजी पोस्ट शेअर केले आहेत. 

सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया आणि उमेश लग्नबेडीत अडकले होते. प्रिया बापट आणि उमेश कामत हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने एकमेकांचे खूप अगोदरपासून चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले पण एकमेकांसाठी असलेले प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या प्रेमाला होकार दिला. हे जोडपं लवकरच ‘आणि काय हवं’ या वेबसीरिजचा तिसरा सीझन घेऊन येत आहेत.   उमेश सध्या ‘अजुनही बरसात आहे’ या मराठी मालिकेत बिझी आहे. 

टॅग्स :उमेश कामतप्रिया बापट