Join us

रायझिंग स्टार 2 च्या मंचावर सुरांची अनोखी मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2018 9:08 AM

संगीताला कोणतेही बंधन नसते. ऐकणाऱ्यांच्या कानांपर्यंत पोचण्यासाठी ते अडथळे पार करते, कुंपणावरून उडी मारते आणि भिंती सुध्दा पार करते. ...

संगीताला कोणतेही बंधन नसते. ऐकणाऱ्यांच्या कानांपर्यंत पोचण्यासाठी ते अडथळे पार करते, कुंपणावरून उडी मारते आणि भिंती सुध्दा पार करते. कलर्सचा लाइव्ह गायनाचा रिअॅलिटी शो रायझिंग स्टार 2 ने उठाओ सोचकी दीवार या हॅशटॅग सह आपल्या समाजातील बंधने मोडून टाकण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्पर्धकांना प्रेरणा दिली आहे. एक मधुर आणि सखोल आवाजात निराश दिवसाचे चमकदार दिवसात रुपांतर करण्याची ताकद असते. प्रत्येकाचा मूड उजळविला आणि सोच की दीवार उचलली होती सुसंवादी आवाजाने, बेंगलोरच्या गुणवान मुलांचा ग्रुप असलेल्या हार्मोनियस कोरस या गटाने.सँड्रा ओबेरॉय यांच्या प्रशिक्षणाखाली तयार झालेल्या हार्मनी कोरसने त्यांच्या समन्वयीत केलेल्या तालावर, एक सुंदर मेलडी गाणे गायले ज्याचा तारे जमीन पर च्या शिर्षक गाण्यात समावेश आहे, आणि तज्ञ शंकर महादेवन यांनी ते स्वतः गायले आहे. त्यांची तरलता आणि एका गाण्यातून दुसऱ्या गाण्यात जाण्याची सहजता यामुळे त्यांना परीक्षकांची वाहव्वा मिळाली विशेषतः शंकर महादेवन यांचे चिंतनशील लक्ष. मोनाली आणि शंकर यांनी त्यांच्या टॅलेंटची आणि प्रयत्नांची स्तुती करणारे एक गाणे त्यांच्या स्वतःच्या मधुर शैलीत हार्मनी कोरस अंदाजावर बांधले.रायझिंग स्टार 2 ची रुजलेल्या वाटा मोडणारी संकल्पना स्पर्धकाच्या कौशल्य आणि टॅलेंटवर संपूर्णपणे भर देते. वयाची किंवा कोणत्याही बंधनाची अट नसलेला हा शो सोलो, ड्युएट आणि ग्रुप/बँड परफॉर्मन्स साठी खुला आहे. प्रेक्षकांचे लाइव्ह मनोरंजन करून मुग्ध करण्याची त्यांची क्षमता आणि त्यांचा आवाज त्यांना राष्ट्रीय प्रसिध्दी मिळवून देणार आहे., त्यांच्या पाठिंब्याच्या प्रत्येक मतामध्ये त्यांचे नशीब त्वरित बदलून टाकण्याची ताकद आहे. व्हियाकॉम 18 चा व्हिडिओ ऑन डिमांड मंचाला लाइव्ह व्होटिंग साठी सपोर्ट दिला आहे वूटने, आणि प्रेक्षकांची व्यस्तता शिखरावर पोहचविणाऱ्या, रायजिंग स्टार 2ने  भारतीय प्रेक्षकांना त्यांचा आवडता महत्वाकांक्षी गायक त्याची पार्श्वभूमी विचारात न घेता निवडण्याची ताकद दिली आहे.