Urfi Javed : उर्फी जावेद तिच्या बोल्ड कपड्यांमुळे आणि तिच्या बिंधास्त विचारांमुळे चर्चेत असते. तिच्यावर टीका करणारे तर काही कमी नाहीत पण आता ती सुद्धा अनेकांवर टीका करत असते. मात्र या टीकेचा तिच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो असे तिने म्हणले आहे. सतत टीका ऐकून मानसिक आरोग्य बिघडते अशी प्रतिक्रिया तिने एका मुलाखतीत दिली आहे.
सध्या उर्फीवर अनेकांनी निशाणा साधला आहे. मग मनोरंजन क्षेत्रातील कलाकार असो किंवा आता राजकारणी सर्वांनीच उर्फीवर टीकास्त्र सोडले आहे. ती सुद्धा सर्वांना तोडीस तोड उत्तरं देत असते. मात्र याचा तिच्यावर नक्की काय परिणाम होतो यावर ती स्पष्टच बोलली आहे.
'आय दिवा' सोशल मीडिया पेजला दिलेल्या मुलाखतीत उर्फी म्हणाली, सतत कोणी तुमच्यावर टीका करत असेल तर स्वाभाविक आहे याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होणार. बाहेर सुद्धा मी बघते एखाद्या मुलीने जे कपडे घातले असतील त्यावर टीका केली जाते. विशेषत: भारतात ही टीका जास्त होते. शिवीगाळ तर प्रचंड होत असते. तुझे आईवडील तुला कसं काही म्हणत नाहीत असंही बोललं जातं. ही टीका मनाला लावून घेतली की मग संताप होतो आणि आपण डिप्रेस होतो. '
Urfi Javed : 'या नेत्याला फॉलो करणाऱ्यांनी मला अनफॉलो करा'; उर्फी जावेदची थेट सद्गुरुंवर टीका
सध्या उर्फी जावेदवरुन राजकीय वातावरणही तापले आहे. एकीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यात वाद सुरु आहे तर दुसरीकडे उर्फीने चित्रा वाघ यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. हा वाद आता आणखी पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. शेवटी उर्फी मात्र तिचं वागणं काही सोडताना दिसत नाही.