Join us

उपेंद्रचा सरपंच भागीरथ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2016 3:02 PM

            सध्या जातींवर आधारित  आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना ग्रामीण भागातील जाती - धर्मावर आधारीत ...

            सध्या जातींवर आधारित  आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना ग्रामीण भागातील जाती - धर्मावर आधारीत  राजकरणावर भाष्य करणारा सरपंच भागीरथामध्ये   उपेंद्र लिमिये सरपंचाची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच डॉ. मोहन आगाशे मोठ्या गॅप नंतर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट समाजाचे प्रबोधन करण्याच्या उद्दोने बनवण्यात आला आहे,  जेव्हा एक  सामान्य व्यक्ती आरक्षणाच्या माध्यमातून सरपंच बनतो  व त्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये  येणारी संकटे  व त्यामधून कुटुंबावर कशा प्रकारचा परिणाम होतो हे सांगणारा हा चित्रपट असणार असल्याचे उपेंद्र लिमये यांनी लोकमत सीएनेक्सशी बोलताना सांगितले. या चित्रपटाचे दिग्दर्शक रामदास फुटाणे असून या चित्रपटामध्ये वीणा जामकर उपेंद्र लिमिये च्या पत्नीची भुमिका साकारणार आहे. मराठीचित्रपटसृष्टीमध्ये राजकरणावर भाष्य करणाºया चित्रपटाची संख्या फार कमी असली तरी ते चित्रपट कॉन्ट्रवर्सी च्या भोवºयात अडकलेले आहेत.