उर्फी जावेद(Urfi Javed)च्या अडचणीत सध्या वाढ होताना दिसत आहे, पण यावेळी उर्फीच्या अडचणीचे कारण तिचे कपडे किंवा तिचा लूक नसून तिचे नाव आहे. आता तुम्ही विचार करत असाल की तिच्या नावामुळे कोणी अडचणीत कसे येऊ शकते. जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण.
अरब देशाच्या नियमांमध्ये बदल झाल्यामुळे उर्फी जावेदच्या अडचणी वाढल्या आहेत. अरब देशाच्या नव्या नियमानुसार आता अरब देशांनी पासपोर्टवर एकच नाव असलेल्या भारतीयांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकली आणि माहिती दिली की ती कधीही यूएईला जाऊ शकणार नाही.उर्फी जावेदने स्टोरीमध्ये लिहिले की, 'माझे अधिकृत नाव आता फक्त UORFI आहे.' नवीन नियमांमुळे उर्फी जावेद कधीही अरबमध्ये जाऊ शकत नाही. खरे तर उर्फीने काही दिवसांपूर्वी तिने नाव बदलले होते. या बदलासोबतच उर्फीने आपल्या नावाच्या इंग्रजी अक्षरांमध्ये 'O' जोडले होते. हा बदलही तिने आपल्या सर्व कागदपत्रांमध्ये केला होता. उर्फी जावेदच्या पासपोर्टवर आता तिचे नवीन नाव आहे. या बदलासोबतच तिने जावेद पासपोर्टमधून काढून टाकले आहे. आता हा बदल उर्फीला खूप महागात पडला आहे.