Join us

Urfi Javed संतापली, 'सामानासकट कॅब ड्रायव्हर झाला रफुचक्कर अन् तासाभराने नशेतच...' ट्वीट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 9:07 AM

उर्फीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सर्व घटना सांगितली आहे.

Urfi Javed :  विचित्र कपड्यांमुळे नेहमी लक्ष वेधून घेणारी उर्फी जावेद आता वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. उर्फीला नुकताच दिल्लीत वाईट अनुभव आला आहे. उर्फीने 'उबर'(Uber) ही कारसेवा ६ तासांसाठी बुक केली होती. दरम्यान उर्फी जेवणासाठी थांबली असतानाच ड्रायव्हर तिच्या सामानासकट रफुचक्कर झाल्याची घटना काल घडली. उर्फीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सर्व घटना सांगितली.'उबर'ला टॅग करत तिने तक्रारही केली. उर्फीच्या या व्हिडिओवर नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत. 

उर्फीने ट्विटरवर कॅब बुक केल्याचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. यात कॅब ड्रायव्हरचे नाव आणि फोटोही आहे. तिने ट्वीट केले की, 'मला उबर कॅब सेवेबाबत (Uber) अत्यंत वाईट अनुभव आला आहे. मी दिल्लीत होते. ६ तासांसाठी मी कॅब बुक केली होती. एअरपोर्टला जात असताना वाटेत मी जेवणासाठी गाडी थांबवली होती. त्याचवेळेस ड्रायव्हर माझ्या बॅगसकटच निघून गेला. यानंतर मी त्याला किती कॉल केले पण तो काही परत यायलाच तयार नव्हता. शेवटी मी माझ्या एका मित्राला सांगितले. मुलाचा आवाज ऐकताच ड्रायव्हर घाबरला आणि एक तासाने परत आला. मात्र धक्कादायक हे होतं की तो नशेत होता. '

आणखी एका ट्वीटमध्ये ती म्हणाली, 'ड्रायरव्हरला नीट चालताही येत नव्हतं. आधी तर त्याने खोटं सांगितलं की तो पार्किंगमध्ये आहे. मग माझ्या मित्राने सतत फोन केला. तरी तो लोकेशन वरुन हलतच नव्हता'. उर्फी उबर कॅब सेवेला उद्देशून म्हणाली, ' उबर(Uber) महिलांसाठी अजिबातच सुरक्षित नाही. आधी ड्रायव्हर सामान घेऊन पळतो आणि दोन तासांनंतर नशेत परत येतो हे महिलांसाठी धोकादायक आहे. '

उर्फीने हा सर्व घटनाक्रम सांगत एक व्हिडिओही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहेच. यात तिने उबर कॅब(Uber) सेवेवर चांगलीच संतापली आहे. तर दुसरीकडे या सर्व प्रकारावर उबर कॅब सेवेने(Uber) ट्विटरवर माफी मागितली आहे आणि योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :उर्फी जावेदसोशल मीडियादिल्लीउबर