उर्फी जावेदची (Urfi Javed) नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. रोज उर्फीच्या नावाची चर्चा होतेच. ‘बिग बॉस ओटीटी’मधून ती प्रकाशझोतात आली. शोमधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली. पण शोमधून बाहेर आल्यानंतरच ती सर्वाधिक चर्चेत राहिली. कमालीच्या बोल्ड फॅशन सेन्समुळेच तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. उर्फी केवळ एकाच कारणानं चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. बोल्ड लुकमुळे उर्फी अनेकदा ट्रोल होते. अशात आता ‘बिग बॉस’ फेम हिंदुस्तानी भाऊने (Hindustani bhau) देखील एक व्हिडीओ शेअर करत उर्फीला थेट धमकी दिली आहे.
हिंदुस्तानी भाऊने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये हिंदुस्तानी भाऊ उर्फीवर धमकीवजा इशारा देताना दिसतोय.
हा मेसेज उर्फी जावेदसाठी आहे....‘जय हिंद... हा मेसेज उर्फी जावेदसाठी आहे. जी स्वत:ला प्रसिद्ध फॅशन डिझायनर समजत आहे. जे कपडे घालून तू बाहेर फिरत आहेस, त्यामुळे बहिणी आणि मुलींपर्यंत एक वेगळा मेसेज पोहोचत आहे. तु जे करत आहेस ती आपली हिंदू संस्कृती नाही....मी प्रेमाने सांगतो. त्यामुळे सुधरणार नसशील तर मी तुला सुधारेल... एका भावाच्या नात्याने प्रेमाने सांगत आहे. त्यामुळे सुधर...,’ असं हिंदुस्तानी भाऊने व्हिडीओत म्हटलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
उर्फीचा पलटवार, मी घाबरणारी नाही...
हिंदुस्तानी भाऊने उर्फीला धमकी देणारा व्हिडीओ शेअर केला खरा. पण उर्फी या धमक्यांना घाबरणारी नाही. तिने हिंदुस्तानी भाऊवर जोरदार पलटवार करत, त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. ‘मी जे करतेय, ती भारताची संस्कृती नाही, मग तू जे करत आहेत ती भारताची संस्कृती आहे का? तुझ्या शिव्यांनी किती लोकं सुधारली आहेत. मला फक्त सुधारायलाच नाही तर, बिघडवायला देखील येतं. आता तू मला धमक्या देत आहेस. एका मिनिटात मी तुला तुरुंगातही पोहोचवू शकते. पण याआधी देखील तू अनेकदा तुरुंगात गेला आहेस...तुरुंगात जाणं चांगला मेसेज आहे का? सर्वांसमोर मुलींना धमकावणं याने चांगला मॅसेज जातो का ?
मित्रांनो याला काही एक फरक पडत नाही. त्याला फक्त आणि फक्त प्रसिद्धी हवी आहे. काही दिवसांपूर्वी हा माझी मदत करुन प्रसिद्धी मिळवण्याच्या प्रयत्नान होता. पण मी त्याला नकार दिला... म्हणून हा मला अशा पोकळ धमक्या देतोय. हे सत्य आहे की इंटरनेटवर मला प्रत्येक जण धमकी देत आहे, मला मारण्याची इच्छा अनेकांच्या मनात आहे. पण मी अशा लोकांना अजिबात घाबरत नाही. पण मला माझ्या सुरक्षेची चिंता आहे. जरी त्यांनी काही केलं नाही तरी त्यांच्या विचारांनी प्रभावित होवून इतर लोक मला नुकसान पोहोचवू शकतात.... पण मी मला वाटेल तेच कपडे घालणार, असं उर्फीने म्हटलं आहे.