Join us

उर्फी जावेदने नाकारली रोहित शेट्टीच्या लोकप्रिय 'शो' ची ऑफर, बड्या प्रोजेक्टसाठी केला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 11:57 AM

प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या नव्या कलेक्शनसाठी उर्फी मॉडेल बनली होती.

Urfi Javed : आपल्या विचित्र फॅशनसाठी ओळखली जाणारी उर्फी जावेदरोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरो के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) शो मध्ये सहभागी होणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार उर्फीने ही ऑफर नाकारली आहे. यामागे नक्की काय कारण असेल असा प्रश्न अनेकांना पडला असणार.

माध्यम रिपोर्टनुसार, उर्फी जावेद 'खतरो के खिलाडी १३' मध्ये सहभागी होण्यासाठी खूपच उत्सुक होती. तिने शोसाठी तयारीही सुरु केली. मात्र आता तिने ऑफर नाकारली आहे. कारण तिने आधीच एका बड्या प्रोजेक्टला तारखा दिल्या होत्या. त्या प्रोजेक्टसोबत खतरो के खिलाडीच्या ऑफरपूर्वीच चर्चा झाली होती. त्यामुळे उर्फीने 'खतरो के खिलाडी'ची ऑफर नाकारली. मात्र उर्फी बड्या प्रोजेक्टसाठीही तितकीच उत्सुक आहे. ती लवकरच तिच्या या नव्या प्रोजेक्टविषयी माहिती देणार आहे.

उर्फी सध्या तिच्या करिअरवर लक्ष देत आहे. नुकतीच ती साऊथच्या एका मॅगझीनच्या डिजीटल कव्हरवर झळकली. तसंच तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या नव्या कलेक्शनसाठी ती मॉडेल बनली होती. याचे फोटो शेअर करताना ती म्हणाली, 'अबू जानी आणि संदीप खोसला यांच्यासोबत काम करायला मिळाले म्हणून मी खूप खूश आहे. ते जे काही करतात त्यात ते मास्टर्स असतात आणि मी जशी आहे तसं त्यांनी मला स्वीकारत उलट आणखी बळ दिलं.' ती पुढे म्हणाली, 'एक वेळ अशी होती की कोणताच डिझायनर मला संधी द्यायचा नाही म्हणून मी स्वत:च माझे कपडे डिझाईन करायला सुरुवात केली.

उर्फी नुकतीच 'स्प्लिट्सव्हिला ४' मध्ये सहभागी झाली होती. या शोमधूनही तिला प्रसिद्धी मिळाली. या शोमध्ये सनी लिओनी (Sunny Leone) आणि अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) हे होस्ट होते.

टॅग्स :उर्फी जावेदसोशल मीडियाटिव्ही कलाकारफॅशनखतरों के खिलाडीरोहित शेट्टी