Join us

'भारतात महिला आळशी' या सोनालीच्या वक्तव्यावर उर्फीची नाराजी; म्हणाली, 'पुरुष महिलांना फक्त...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 11:48 AM

सोनालीने केलेल्या विधानावर काहींना तिचं म्हणणं पटलंय तर काहींनी मात्र नाराजी दाखवली आहे.  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं (Sonali Kulkarni) एक वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे. आजकालच्या मुली आळशी आहेत त्यांना चांगला पगार असलेला नवरा हवा स्वत: मात्र काही करायचे नाही असे वक्तव्य तिने केले होते. तिच्या या विधानावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) हिने सोनालीच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवली आहे.

सोनालीने केलेल्या विधानावर काहींना तिचं म्हणणं पटलंय तर काहींनी मात्र नाराजी दाखवली आहे.  उर्फीने सोनालीचा व्हिडिओ रिट्वीट करत लिहिले की, 'तू जे काही बोललीस ते किती असंवेदनशील आहे. आजकालच्या काळातील महिलांना तू आळशी म्हणत आहेस जेव्हा की त्या घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळत आहेत. चांगला पगार कमावणारा नवरा हवा यात तरी गैर काय? शतकानुशतके पुरुष महिलांना फक्त मुलं जन्माला घालण्याचे मशीन म्हणूनच बघत आले आहेत.आणि लग्नाचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे हुंडा हेच असतं. महिलांनो तुम्ही तुमच्या अटी आणि मागण्या बिंधास्त मांडा. होय, महिलांनी काम केले पाहिजे ते बरोबर आहे, पण हा विशेषाधिकार आहे जो प्रत्येकाला मिळत नाही.' 

दरम्यान सोनालीचं हे वक्तव्य सध्या चर्चेका मुद्दा बनलंय. सोनालीच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर चर्चासत्रच रंगलंय. तसेच तिच्यावर टीकाही केली जातीये. या सर्वांवर अद्याप सोनालीची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

टॅग्स :सोनाली कुलकर्णीउर्फी जावेदसोशल मीडिया