'बिग बॉस ओटीटी'च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. अभिनयापेक्षा उर्फी तिच्या चित्रविचित्र ड्रेसिंगसेन्समुळे चर्चेत येत असते. परंतु, यावेळी ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच उर्फीने उदयपूरमध्ये झालेल्या कन्हैय्यालाल हत्याकांडवर भाष्य केलं. तिची ही पोस्ट पाहून एका व्यक्तीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी उर्फीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने इस्लाम धर्माविषयी भाष्य केलं होतं. ज्यानंतर तिला धमकीचे फोन, मेसेज येऊ लागले. या प्रकरणी उर्फीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.काय आहे उर्फीची पोस्ट?
अल्लाह धर्माच्या नावाखाली कधीच अशा चुकीच्या गोष्टी करण्याची परवानगी देत नाहीत, असं उर्फी म्हणाली होती. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिला धमकीचे फोन, मेसेज केले. इतकंच नाही तर काहींनी तिला ट्रोलही केलं.
धमकी देणाऱ्या विरोधात उर्फी करणार तक्रार
"तुझं तोंड बंद कर. तुला काय माहित इस्लाम काय आहे. आमची शान आहे ती. आमच्या शानमध्ये कोणी बाधा आणत असेल तर आम्ही ते कसं सहन करणार?", असा मेसेज एका युजरने उर्फीला केला. या मेसेजचा स्क्रीन शॉट शेअर करत या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं उर्फीने सांगितलं.दरम्यान, हा स्क्रीनशॉट शेअर करत उर्फीने मुंबई पोलिसांना टॅग केलं आहे. संबंधित व्यक्ती धर्माच्या नावाखाली धमकी देत असल्याचंही तिने म्हटलं आहे.