Join us

Urfi Javedला तरुण मुलांनी फोनवरुन केली शिवीगाळ, अभिनेत्री संताप व्यक्त करत म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 12:28 PM

Urfi Javed : सोशल मीडिया सेन्सेशन आणि टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच चर्चेत येत असते. आपल्या चित्रविचित्र फॅशनमुळे ती नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असते.

सोशल मीडिया सेन्सेशन आणि टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच चर्चेत येत असते. आपल्या चित्रविचित्र फॅशनमुळे ती नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामनादेखील करावा लागतो. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. दरम्यान उर्फीला एका तरुण मुलांच्या ग्रुपकडून नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. याबाबत तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन स्टोरी शेअर करत याबाबत संताप व्यक्त केला आहे.

उर्फी जावेदने इंस्टाग्राम स्टोरीवर फोन करुन त्रास देणाऱ्या मुलाचे अकाउंट शेअर केले आहे आणि लिहिले की, हा मुलगा आणि त्याचे दहा मित्र मला दररोज कॉल करत आहेत. माझा नंबर यांना कुठून मिळाला, हे मला माहीत नाही. ते फोनवर मला शिव्या देत आहेत.

तिने पुढे लिहिले की, हल्लीच्या पिढीतल्या मुलांना काय झालं आहे? कारण नसताना ते मला नाहक त्रास देत आहेत. या मुलांविरोधात मी पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी जात आहे. या मुलांच्या आई-वडिलांना कोणी ओळखत असेल तर मला सांगा. मी त्या व्यक्तीला बक्षीस देईन.

उर्फी जावेद सध्या एमटीव्हीवरील रिएलिटी शो स्प्लिट्सविला १४ मध्ये सहभागी झाली आहे. बिग बॉस १६मधील स्पर्धक बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक साजिद खानविरोधातही उर्फीने वक्तव्य केल्यामुळे ती चर्चेत आली होती.