टेलिव्हिजनवर 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' (Celebrity Masterchef) हा शो जोरात सुरु आहे. या शोला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. टीव्हीवरील, सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरे या शोमध्ये दिसत आहे. निक्की तांबोळी, उषा नाडकर्णी, तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, अर्चना गौतम, फैजल शेख यांसारखे सेलिब्रिटी दिसत आहेत. फराह खान होस्ट तर रणवीर ब्रार आणि शेफ विकास खन्ना या शोचे परीक्षक आहेत. नुकतंच एका एपिसोडमध्ये उषा नाडकर्णींना (Usha Nadkarni) रडू कोसळलं. नक्की काय कारण होतं?
'सेलिब्रिटी मास्टरशेफ' हा कुकिंग शो आहे. यामध्ये सर्व स्पर्धकांना एक पदार्थ बनवण्याचा टास्क असतो. यावेळी त्यांना वन पॉट चॅलेंज मिळालं होतं. एकाच भांड्याचा वापर करुन त्यांना पदार्थ बनवायचा होता. हे स्पर्धकांसाठी फार आव्हानात्मक होतं. यानंतर टास्कमध्ये पदार्थांची अदलाबदली करायला सांगतात. उषा नाडकर्णी आणि गौरव खन्ना हे एकमेकांच्या पदार्थांची अदलाबदली करतात. यानंतर गौरवने केलेला पदार्थ पुढे उषाताईंना करायचा होता. दरम्यान गौरव नक्की कोणता पदार्थ बनवतोय हे त्यांना समजलंच नाही. रेसिपी करताना अखेर त्या हतबल झाल्या आणि रडायलाच लागल्या. गौरवने त्यांची समजूत काढली आणि पदार्थ कसा करायचा हे समजवून सांगितलं. गौरवच्या समजूतदारपणाचं खूप कौतुक होत आहे. त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
'सेलिब्रिटी मास्टरशेफ' मध्ये नवनवीन घडामोडी घडत असतात. काही दिवसांपूर्वीच दीपिका कक्करने शो सोडला. आता तिच्या जागी शिव ठाकरे येण्याची चर्चा आहे. दुसरीकडे गौरव खन्ना या शोचा विजेता झाल्याचीही बातमी पसरली होती. गौरव आणि निक्की तांबोळीची तू तू मै मै सतत व्हायरल होत असते. आता खरोखर शओचा विनर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.