'द कपिल शर्मा'शोमध्ये उषा उथुप म्हणाल्या, 'गाने गाने पे लिखा है गाने वाले का नाम'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 07:15 AM2019-05-25T07:15:00+5:302019-05-25T07:15:00+5:30

'द कपिल शर्मा' शोमध्ये यावेळी बॉलिवूडची इंडी-पॉप, जॅझ आणि पार्श्वगायिका उषा उथुप आणि पार्श्वगायक सुदेश भोसले हजेरी लावणार आहेत.

For Usha Uthup, ‘Gane Gane Pe Likha Hota Hai Gaane Wale Ka Naam’ | 'द कपिल शर्मा'शोमध्ये उषा उथुप म्हणाल्या, 'गाने गाने पे लिखा है गाने वाले का नाम'

'द कपिल शर्मा'शोमध्ये उषा उथुप म्हणाल्या, 'गाने गाने पे लिखा है गाने वाले का नाम'

googlenewsNext
ठळक मुद्देसुपरहिट गीतांवर ते प्रेक्षकांना देखील ठेका धरायला लावतील

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'द कपिल शर्मा' शोमध्ये यावेळी बॉलिवूडची इंडी-पॉप, जॅझ आणि पार्श्वगायिका उषा उथुप आणि पार्श्वगायक सुदेश भोसले येणार असल्याने हा वीकएंड नक्की संगीतमय होणार आहे. ते यावेळी चित्रपट उद्योगातील त्यांच्या गौरवशाली वाटचालीबद्दल कपिल शर्मासोबत गप्पा मारतील. तसेच, त्यांच्या काही सुपरहिट गीतांवर ते प्रेक्षकांना देखील ठेका धरायला लावतील. बॉलिवूड गायकांबद्दल बोलताना उषा उथुपने 1971 मधील हरे राम हरे कृष्ण चित्रपटातील ‘दम मारो दम’ या गीताच्या संदर्भात स्व. संगीतकार आर डी बर्मन आणि अशा भोसले यांच्याबद्दल काही माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या.


 
उषा उथुप म्हणाल्या, “असे ठरले होते की, ‘दम मारो दम’ हे एक द्वंद्वगीत असेल. मी आणि आशाजी ते म्हणणार होतो. रेकॉर्डिंगसाठी तयारी म्हणून आम्ही दोघींनी खूप सराव  केला. पण रेकॉर्डिंगच्या दिवशी मला बोलावणे आले नाही, त्यामुळे मग मीच आर डी बर्मनजींना फोन केला, त्यावर, त्यांनी सांगितले की, हे गीत आशा भोसलेच म्हणेल. मी थोडी नाराज झाले पण मी नक्कीच चिडले नव्हते कारण माझा यावर विश्वास आहे की, “गाने गाने पे लिखा है गाने वाले का नाम”. त्यापुढे म्हणाल्या, “त्यानंतर मला आशाजींबरोबर ‘हरे रामा हरे कृष्णा’ हे गीत गाण्याची संधी मिळाली.”
 
या कार्यक्रमात पुढे गायनाची 50 वर्षे पूर्ण करणार्‍या आणि 17 भारतीय व 8 विदेशी भाषांत गाणी म्हणणार्‍या अष्टपैलू गायिका उषा उथुपने हे सांगितले की, द कपिल शर्मा शोमध्ये येण्याचे तिचे स्वप्न होते कारण ती कपिलची खूप मोठी चाहती आहे आणि तिला कपिल आणि त्याच्या टीमची उत्स्फूर्तता खूप आवडते.
 

Web Title: For Usha Uthup, ‘Gane Gane Pe Likha Hota Hai Gaane Wale Ka Naam’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.