Join us

देखो ना खुद को जरा... परदेसी गर्ल अन् रांगड्या गडीचा रोमान्स, इरिना-वैभवचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 12:40 IST

इरिनाने सोशल मीडियावर वैभवसोबतचा एक व्हिडीओ शेअर केलाय.

 Vaibhav Chavan Irina Rudakova : 'बिग बॉस मराठी'चे पाचव्या पर्वातील एक जोडी महाराष्ट्राला पसंत पडली होती.  ती म्हणजे परदेसी गर्ल इरिना रुडाकोवा आणि बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण यांची. 'बिग बॉस'च्या घरात दोघांमधील मैत्री आता 'बिग बॉस'च्या घराबाहेरही ते दोघे जपताना दिसून येत आहेत. नुकतंच इरिना-वैभवचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघांचा रोमँटिक डान्स पाहायला मिळतोय. 

इरिनाने सोशल मीडियावर वैभवसोबतचा एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये वैभव आणि इरिना हे जिममध्ये 'देखो ना देखो ना...' या रोमँटिक गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर इरिना-वैभवचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर चाहत्यांनी भरभरुन कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तर त्यांना आता लग्न उरकून घ्या असा सल्लाही दिलाय.

नुकतेच इरिना आणि वैभव हे दोघे कोल्हापूरात धनंजय पोवारला भेटले. त्यानंतर ते सुरज चव्हाणच्या गावीदेखील पोहचले होते. इरिनाने कलर्स मराठी वाहिनीच्या 'इंद्रायणी' मालिकेतून मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केले. 'बिग बॉस' संपल्यानंतर इरिना आणि वैभव अनेक वेळा एकत्र स्पॉट होतात. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. 'बिग बॉस मराठी' ५ नंतर एका मुलाखतीत वैभव चव्हाणला त्याच्या आणि इरिनाच्या नात्याबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर त्याने "आमच्यात फक्त मैत्री आहे. ही मैत्री कायम अशीच राहू दे, अशी माझी इच्छा आहे", असे म्हटले होते.

टॅग्स :बिग बॉस मराठीनृत्यसेलिब्रिटी