Join us  

"मी रडत होतो...", वैभव तत्ववादीने शेअर केला सचिन तेंडुलकरसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 11:30 AM

वैभवला केवळ सचिनला भेटायचीच संधी मिळाली नाहीये तर त्याला मास्टर ब्लास्टरसोबत एका जाहिरातीत कामंही करायला मिळालं. याचाच अनुभव त्याने शेअर केला आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खेळाचे सगळेच फॅन आहेत. त्याने त्याच्या खेळीने क्रिकेटचं मैदान गाजवलं. सर्वसामान्य घरातून आलेल्या सचिनने यशाची उंचच उंच शिखरे गाठली. आयुष्यात त्याला एकदा तरी भेटावं असं त्याच्या प्रत्येक चाहत्याला वाटत असतं. मराठी अभिनेता वैभव तत्ववादीही सचिनचा मोठा चाहता आहे. वैभवला केवळ सचिनला भेटायचीच संधी मिळाली नाहीये तर त्याला मास्टर ब्लास्टरसोबत एका जाहिरातीत कामंही करायला मिळालं. याचाच अनुभव त्याने शेअर केला आहे. 

वैभव तत्ववादी आणि सचिन तेंडुलकरने चितळे बंधूंच्या जाहिरातीत एकत्र काम केलं आहे. ही जाहिरात शेअर करत वैभवने मास्टर ब्लास्टरसोबत काम करण्याचा अनुभव शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे. 

वैभव तत्ववादीची पोस्ट 

ही जाहिरात शूट करताना एअर कंडिशन फ्लोअरवर असूनही मी आत्तापर्यंत सर्वात जास्त मेकअप केला होता. ५-५ मिनिटांनी माझा मेकअप आर्टिस्ट टच अप करण्यासाठी येत होता. मी चिडून त्याला विचारलं की मला घाम येत नसतानाही तू सारखा का येत आहेस? तो म्हणाला, सर तुम्ही रडताय. तेव्हा मला जाणवलं की हा अनुभव माझ्यावर किती प्रभाव करतोय. माझ्या बालपणीच्या आठवणीत मी रमलो होतो. आता हे लिहितानाही माझे डोळे पाणावले आहेत. सचिनने निवृत्ती घेतल्यापासून क्रिकेट माझ्यासाठी पूर्वीसारखं राहिलेलं नाही. या नम्रतापूर्वक व्यक्तीला भेटल्यानंतर आणि त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर मला माझ्यात बदल जाणवत आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकरबरोबर काम करणं हे माझ्यासाठी स्वप्न सत्यात उतरल्यासारखं आहे. 

दरम्यान, वैभवने मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही नाव कमावलं आहे. अनेक हिंदी सिनेमांमध्येही त्याने काम केलं आहे. त्याता 'अ वेडिंग स्टोरी' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

टॅग्स :वैभव तत्ववादीसचिन तेंडुलकर