Join us

"तू कमाल मित्र आहेस यार..", वैशाली भोसलेने सहकलाकार शशिकांतला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 1:52 PM

Sara Kahi tichyasathi : मंजूची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैशाली भोसले हिने तिचा सहकलाकार म्हणजेच शशीची भूमिका साकारणारा अभिनेता शशिकांत केरकर याच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं. या मालिकेतील खोत कुटुंबानं प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील दादा खोत आणि उमाईला प्रेक्षकांची पसंती मिळाली. याशिवाय या मालिकेतील मंजू, तिचा नवरा शशी आणि मुलगा डुग्गू यांनीदेखील प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. दरम्यान मंजूची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैशाली भोसले (Vaishali Bhosale) हिने तिचा सहकलाकार म्हणजेच शशीची भूमिका साकारणारा अभिनेता शशिकांत केरकर (Shashikant Kerkar) याच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. 

वैशाली भोसले हिने इंस्टाग्रामवर शशिकांत केरकरसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, आज वर्ष झालं तुझ्यासोबत काम करताना... अनेक वळणं आली या प्रवासात... तू प्रत्येक टप्प्यावर मला साथ देत आलास.. (एक दोन वेळा नाही दिलीस साथ ते आहे माझ्या लक्षात पण आज फक्त चांगलंच बोलायचं आहे ना.. सॉरी सॉरी) रूसले.. रागावले.. भांडले तुझ्यासोबत.. तुझ्याकडून जबरदस्तीने रिल्स करुन घेतले.. करायला लावले..जे केलं ते हक्काने केलं.. अर्थात तू तो हक्क दिलास मला..

तिने पुढे म्हटले की, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे.. तू भारी सहकलाकार आहेस.. तू सोबत असल्यामुळे माझा मंजूचा प्रवास खूप सोपा झाला शशा.. तुझे कितीही आभार मानले तरी कमीच आहेत. खूप मजा येतेय तुझ्यासोबत काम करताना.. आणि मला सगळ्यात जास्त काय आवडतं सांगू..?? जेव्हा माझा क्लोज सुरू असतो तेव्हा तू जे काही माझं बारकाईने निरीक्षण करत असतोस.. तेव्हा पालक कसे आपल्या मुलाला परफॉर्म करताना कौतुकाने पाहत असतात.. अगदी तसंच वाटतं मला..किती भारी आहे ना हे..एक सहकलाकार म्हणून एक गुरु म्हणून तू माझा कायम आवडता कलाकार असणार आहेस.. सर्व सुंदर अविस्मरणीय  आठवणींसाठी आभारी आहे. आजच्या तुझ्या वाढदिवसादिवशी हे सगळं शेयर नाही केलं तर कसं चालेल ना…?? तुला वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा!!!! तुझ्या सगळ्या ईच्छा पूर्ण होवोत..तुला जे जे हवंय ते सगळं मिळो.. वाढदिवसाच्या शुभेच्छा स्मितचा बाबा.