Join us

बिग बॉस मराठी २ : लेक असावी तर अशी, वैशालीच्या मुलीनं तिच्याकडे मागितले हे आगळे-वेगळे बर्थ डे गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 06:30 IST

वैशाली माडे बिग बॉसच्या घरातली स्ट्राँग कंटेस्टंट आहे. तिची बिग बॉसच्या घरात सध्या यशस्वी घोडदौड सुरू असताना, तिच्या मुलीचा वाढदिवस जवळ आला आहे.

ठळक मुद्देवैशाली यंदा मात्र आपल्या मुलीसोबत वाढदिवसाच्या दिवशी नसणार आहे

वैशाली माडे बिग बॉसच्या घरातली स्ट्राँग कंटेस्टंट आहे. तिची बिग बॉसच्या घरात सध्या यशस्वी घोडदौड सुरू असताना, तिच्या मुलीचा वाढदिवस जवळ आला आहे. आपल्या मुलीचा वाढदिवस दरवर्षी थाटात साजरा करणारी वैशाली यंदा मात्र आपल्या मुलीसोबत वाढदिवसाच्या दिवशी नसणार आहे.

19 जुलैला वैशालीच्या मुलीचा आस्थाचा वाढदिवस आहे. जुलै महिना सुरू झाल्यावर वैशालीने यंदा आपण आस्थासोबत वाढदिवशी नसल्याची बिग बॉसमध्ये  खंत व्यक्त केली होती. वैशाली म्हणाली होती, “आस्थाचा बर्थ डे मंथ आता सुरू झाला आहे. दरवर्षी न चुकता तिचा वाढदिवस मी साजरा करते. यंदा ती अकरा वर्षाची होणार. म्हणजे आता पुढच्या वर्षी माझी मुलगी टिनेजर होणार यावर खरं तर विश्वासच बसत नाही. अकरा वर्ष कशी गेली कळलंच नाही. असं वाटतंय, ही चिमुकली आता तर जन्माला आली होती. मी घरात असताना तिचा सतत ममा-ममाचा घोष चालु असतो. आता यंदा ती कशी साजरा करेल तिचा वाढदिवस?”

ह्यावर वैशालीच्या मुलीने तिच्यासाठी एक मेसेज रेकॉर्ड केलाय. आस्था म्हणते, “माझे आजवरचे वाढदिवस दिमाखदार पध्दतीने साजरे व्हावेत, आणि ते मेमरेबल असावेत, ह्यासाठी माझी आई दरवर्षी खुप छान नियोजन करायची. वाढदिवसाच्यावेळी कोणतेही शो किंवा रेकॉर्डिंग न ठेवता ती माझ्यासोबतच टाइम स्पेंड करायची. यंदा मात्र मी ममाला खूप मिस करेन. पण ममा तू माझी काळजी करू नको. आजी यंदा माझा वाढदिवस साजरा करणार आहे.  तू असंच चांगलं खेळत रहा. स्ट्राँग रहा आणि 1 सप्टेंबरला मला तुझ्या हातात ट्रॉफी पाहायचीय. 

टॅग्स :बिग बॉस मराठीवैशाली माडे