Join us

व्हिजे बानी सांगतेय, गौहर खान आणि माझ्यात भांडणं झालेलीच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 7:10 AM

गौहर खान आणि व्हिजे बानी हे दोघे बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळाले होते.  खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप ...

गौहर खान आणि व्हिजे बानी हे दोघे बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळाले होते.  खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. बिग बॉसच्या घरातच लोकांना त्यांच्यात असलेली फ्रेंडशिप पाहायला मिळाली होती. तेव्हापासूनच त्यांच्या मैत्रीची मीडियात चांगलीच चर्चा आहे. ते दोघे सोशल मीडियावर नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो अपलोड करत असतात. पण काही दिवसांपूर्वी बानीने गौहरसोबतचे असलेले तिचे फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले असल्याचे म्हटले जात आहे. बानी आणि गौहर यांच्यात भांडणे झाली असल्याने बानीने असे केले असल्याची चर्चा आहे.बानी आणि गौहर हे बिग बॉसच्या घरात आल्यापासून फ्रेंड्स झाले असेच सगळ्यांना वाटत होते. बानी आणि गौहर हे बिग बॉसमध्ये येण्याच्या अनेक वर्षं आधीपासूनच एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. बिग बॉसमध्ये सहभागी होण्याासाठी गौहर आणि बानी यांना ज्यावेळी विचारण्यात आले होते. त्यावेळी देखील त्यांनी एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतला होता. गौहरच्याच सांगण्यावरून बानी बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती. पण आता बानी आणि गौहरमध्ये कडाक्याचे भांडणं झाले असल्याचे गेल्या काही दिवसांपासून म्हटले जात आहे. पण या सगळ्या केवळ अफवा असल्याचे बानीने नुकतेच बॉलिवूड लाईफ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. बानी सांगते, मी या अफवा गेल्या अनेक दिवसांपासून ऐकत आहे. या गोष्टी चुकीच्या असून या सगळ्या गोष्टी कोण पसरवत आहे हेच मला कळत नाहीये. माझ्यात आणि गौहरमध्ये काहीही वाद झालेले नाहीत. लोकांना चुकीच्या गोष्टींवर चर्चा करायला आवडते असे मला वाटते.Also Read : गौहर खानच्या मते, या आहेत बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील सर्वांत फिट अभिनेत्री !