छोट्या पडद्यावरील 'भाभीजी घर पर हैं' ही मालिका दिवसेंदिवस रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. या मालिकेत दिवसागणिक येणारे ट्विस्ट आणि रंजक कथानक यामुळे मालिका लोकप्रिय ठरली आहे. यातील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. यापैकी एक खास आणि विशेष व्यक्तीरेखा म्हणजे विभूती नारायण. त्याची दरवेळेस काही ना काही फजिती होते आणि त्याची फजिती रसिकांना विशेष भावते. मात्र आता मालिकेत असं काही घडले होते की, ते ऐकून सारेच चक्रावले होते.
मालिकेत दाखवल्याप्रमाणे रिकामटेकडा म्हणून प्रसिद्ध असणारा विभूती नारायण मिश्रा आपल्या पत्नीसाठी काही तरी स्पेशल करणार असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यामुळे पैसा कमावण्यासाठी वेगवेगळे मार्ग तो शोधायचा. त्यानुसार त्याला एक पर्याय सुचला आणि स्पर्म डोनर बनणार दाखवण्यात आले होते. आगामी काळात भाभीजी घर पर हैं ही मालिका दिवसेंदिवस आणखी रंजक ठरणार आहे. खासकरुन यातील विभूती नारायण मिश्रा रसिकांचं आणखी मनोरंजन करत त्यांना खळखळून हसवणार असंच दिसत आहे.
2012 मध्ये 'विकी डोनर' सिनेमा आला होता.स्पर्म डोनेशनवर आधारित हा सिनेमा बराच गाजला आणि सोबतच आयुष्मानच्या अभिनयाचेही कौतुक झाले. या सिनेमातील पानी दा रंग... हे गाणे स्वतः आयुष्मानने गायले होते. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्याचा आणि फिल्मेफअरचाच सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा अवॉर्ड मिळाला होता. या सिनेमाच्या कथानकामुळे हा सिनेमा गाजला आणि हाच धागा पडकडत मालिकेतही स्पर्म डोनर हा विशेष भाग पाहायला मिळाला. छोट्या पडद्यावरील 'भाभीजी घर पर हैं' मालिकेतील हा खास भाग रंगला होता.