'बिग बॉस'च्या नुकत्याच झालेल्या 'वीकेंड का वार' मध्ये विकी जैनला (Vicky Jain) चांगलंच दारेवर धरण्यात आलं. आपल्या आईसमोर विकीने पत्नी अंकिताची बाजू घेतली नाही यावरुन करण जोहरने विकीला सुनावलं. पण विकीला हे आरोप मान्य नव्हते. त्याने नंतर अंकिताशी चर्चा करताना मागील पाच वर्षात त्याने तिला किती मदत केली याचा पाढा वाचला. यावेळी विकीने पहिल्यांदाच सुशांतसिंह राजपूतचाही उल्लेख केला.
विकी म्हणाला,"जेव्हा मी तुझ्या कुटुंबासोबत असतो तेव्हा मी एक श्रीमंत जावई म्हणून राहतो की एक मुलगा म्हणून? मी सुद्धा स्वत:ला तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या लाईफस्टाईलशी जुळवून घेतलं. जेव्हा आपण रिलेशनशिपमध्ये आलो तेव्हा तुझं आणि सुशांतचं नातं जगजाहीर होतं. मला आता त्याची किंमत चुकवावी लागत आहे. मी सगळं स्वत:वर घेतलं आहे. जर तुला माझ्यामुळे काही अडचण असती तर तू माझ्याशी लग्न करण्याचा निर्णयच घेतला नसता. तो तुझाच निर्णय होता. मी नेहमीच तुझ्या कुटुंबासोबत उभा राहिलो."
यावर अंकिता म्हणाली,"मला माहित आहे विकी. तू मला जे प्रेम दिलंस तेवढंच प्रेम तुझ्या कुटुंबानेही दिलं. याच कारणामुळे मला वाईट वाटलं आणि मी याबद्दल कोणाशीही बोलले नाही. मी करण जोहरलाही मध्येच थांबवलं. माझ्यासाठी आपलं नातं आणि आपलं कुटुंब यापेक्षा महत्वाचं काहीच नाही. मी माझ्या सासरच्या लोकांचं प्रेम गमावू शकत नाही."
विकी म्हणाला,'एका सॉरीमुळे सगळं ठीक होऊ शकत नाही. लोकांच्या प्रतिमेला धक्का लागत आहे. मी डिप्रेस होतोय. मी नेहमीच तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिलो." असं म्हणत विकीने नॅशनल टेलिव्हिजनवर त्याची नाराजी दर्शवली आहे.