ठळक मुद्देविदुला देतेय आता फिटनेस आणि अभ्यासाला पूर्ण वेळ घरातल्यांसोबत एन्जॉय करीत आहे वेळ
एप्रिलच्या प्रारंभीच जीव झाला येडापिसा मालिका संपली अन् सिद्धीची भूमिका साकारलेली कोल्हापूरची विदुला चौगुले बारावीच्या अभ्यासात मग्न झाली. कोरोनाचा लॉकडाऊन तिच्यासाठी फायद्याचाच ठरतोय.
आई-वडील माझ्यावर खूपच खूश असल्याचे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे. असे असले तरी ती जीव झाला येडापिसाच्या शूटिंग टीमला चांगलीच मिस करतेय. शूटिंगच्या निमित्ताने एक वेगळी फॅमिली तयार झाल्याचे सांगून तेथील सदस्यांसह कौटुंबिक आनंद घेतल्याचे ती सांगते.