Join us

या कारणामुळे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 4:37 PM

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हि मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असली तरी प्रेक्षकांचा या मालिकेला भरघोस प्रतिसाद मिळतोय.

लोकप्रिय आणि कायम लक्षात राहील अशी व्यक्तिरेखा म्हणजे राणा दा. हा राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आता सिद्धार्थ देशमुख या नव्या व्यक्तिरेखेसह तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हि मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असली तरी प्रेक्षकांचा या मालिकेला भरघोस प्रतिसाद मिळतोय. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी  देणारी ही मालिका आहे. मालिकेतील एकत्र कुटुंब पद्धती आणि एकंदरतीच देशमुख कुटुंबातील सदस्यांची एकमेकांबद्दलच नाही तर त्यांच्याकडील पशु-पक्षांबद्दल देखील असलेली आत्मीयता प्रेक्षकांना भावली. 

नुकतंच मालिकेत ऐश्वर्या म्हणजेच देशमुख घरातील म्हशीच बाळंतपण प्रेक्षकांनी पाहिलं. ऐश्वर्या बाळंत होणार, म्हणून घरातील सगळेचजण काळजीत असतात. प्रत्येकाची सुरु असलेली धावपळ बघून ऐश्वर्या म्हैस आहे की मुलगी यात अदितीचा गोंधळ होतो. दिवसाअंती म्हैस व्हायते आणि सगळे टेन्शन फ्री होतात. त्यामुळे देशमुख कुटुंब हे फक्त माणसांपुरती मर्यादित नसून त्या घरातील पशु-पक्षी देखील त्यांचं कुटुंबच आहे असं सिद्धार्थ अदितीला सांगतो. हा प्रसंग अगदी मनाला भावणारा होता. मालिकेतील याच वेगळेपणामुळे प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर उचलून धरलं आहे. सिद्धार्थ आणि अदिती सोबत घरातील प्रत्येक व्यक्ती हि प्रेक्षकांना आपलीशी आणि आपल्यातलीच एक वाटतंय.

प्रेक्षकांचा मालिकेला मिळणार उत्फुर्त प्रतिसाद बघून अदिती म्हणजे अभिनेत्री अमृता पवार म्हणाली, "प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा पाहून आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद होतो आहे. त्यांची उस्फुर्त प्रतिक्रिया हीच आमच्या कामाची पावती आहे. या मालिकेसारखं वातावरण खूप कमी बघायला मिळतं.

अदितीला माणसांबद्दल भीती असणं हा गुण वास्तवातही कुठे ना कुठे पहायला मिळतो. माणसं आपल्या आपल्यातच इतकी रमतात की, छोट्या कुटुंबातही त्यांचं एकमेकांकडं लक्ष नसतं. एकमेकांशी कम्युनिकेशनच नसतं. मोठ्या कुटुंबात न राहून आपण नक्की काय मिस करतोय हे आजच्या जनरेशनला या मालिकेच्या माध्यमातून समजतंय. मोबाईल आणि कॅाम्प्युटरच्या पलिकडे जाऊन माणसांचंही एक जग असतं हे युथला समजतंय. त्यात काय सुख असतं हे प्रेक्षकांना जाणवतंय."

टॅग्स :हार्दिक जोशी