Join us

'विक्रम बेताल की रहस्य गाथा' मालिकेसाठी विंध्या तिवारीने स्विकारले 'हे' आव्हान !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 7:15 AM

'विक्रम बेताल की रहस्य गाथा' या मालिकेत विंध्या आपल्या नव्या अवतारात दिसून येईल, ज्यात थोडी नेगिटीव्ह शेड असेल.

वाराणसी या आध्यात्मिक शहरातून आलेल्या विंध्या तिवारीने आपल्या अभिनयाने अभिनेत्री म्हणून स्थान मिळवले आहे. नकारात्मक भूमिका असो किंवा शहरी महिलेची भूमिका, ह्या अभिनेत्रीने आपल्या प्रत्येक भूमिकेला न्याय देत प्रत्येक व्यक्तिरेखा ताकदीने साकारली आहे. 'वारीस', 'हाफ-मॅरेज' आणि 'लाल- इश्क' सारख्या मालिकांमुळे ओळखली जाणारी ही अभिनेत्री आता आपल्याला 'विक्रम बेताल की रहस्य गाथा'  मालिकेत “जोगिनी” ची भूमिका साकारताना दिसणार आहे. आपली व्यक्तिरेखा काही वेळ बाजूला ठेवून तिच्या दडलेल्या गुणांचीही ओळख तिच्या चाहत्यांना होणार आहे. पहिल्यांदाच मालिकेसाठी ती एक गाणे गाणार आहे. ज्यात तिने अभिनय केलेला आहे. 

विंध्यासाठी खूप आव्हानात्मक होते. एक जुनी हिंदी बोलीभाषा, खारबोलीत आपल्या आवाजात हे गीत गाताना अभिनेत्रीला प्रचंड पूर्वतयारी करावी लागली. आपल्या पुर्वतयारीबद्द्ल बोलताना तिने सांगितले की, “खारबोली बोलीभाषा हे हिंदी भाषेचं शुध्द रूप आहे आणि ही बोलीभाषा भारताच्या काही भागातच बोलली जाते. या बोलीभाषेत बोलणे जरा अवघड होते आणि मला गायचे होते. त्यामुळे जेव्हा 'विक्रम बेताल की रहस्य गाथा' ह्या मालीकेसाठी मला खारबोली भाषेत गायची संधी मिळाली, तेव्हा मला माहिती होतं की हे एक आव्हान असणार आहे.

हातात अगदी कमी संसाधने असताना ह्या भाषेतील शब्द मी किती अचूकपणे ग्रहण करू शकेन ह्याची मला खात्री नव्हती. म्हणूनच मी कबीर आणि संत नामदेव ह्यांच्या कवितेचे संदर्भ घेतले. मालिकेचे चित्रीकरण करण्याआधी मी तासनतास ह्या कविता वाचून काढल्या आहेत जेणेकरून माझे उच्चार शुध्द आणि लयबद्ध होतील. इतकं की शेवटच्या रेकॉर्डिंगपूर्वी मी जवळ जवळ दोन दिवस ह्या गाण्याचा सराव करत होते. 

विंध्याने नेहमीच आपल्या अभिनयात वेगवेगळे प्रयोग करण्याला प्राधान्य दिले आहे. कारण ह्यातून तिला केवळ सर्वश्रेष्ठ अभिनय करायलाच नव्हे तर वगेवगेळ्या गोष्टी शिकायला मिळते. 'विक्रम बेताल की रहस्य गाथा' या मालिकेत विंध्या  आपल्या नव्या अवतारात दिसून येईल, ज्यात थोडी नेगिटीव्ह शेड असेल.

राज विक्रमादित्यचे राज्य आणि त्याचे राणी पद्मिनीशी असलेले नाते याबद्दल तिचा काय हेतू आहे, तिच्या काय महत्त्वाकांक्षा आहेत याची काहीच कल्पना नसताना राजाने तिला उज्जैनी महालात आणले आहे. आता पुढे काय होते याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच आहे.