'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'फू बाई फू' अशा कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखा यांच्या विविधरंगी भूमिका चांगल्याच गाजल्या. विशाखा सध्या शुभविवाह मालिकेत वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. विशाखा सुभेदार या गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा अनुभव विशाखा यांनी सर्वांसोबत शेअर केलाय.
विशाखा सुभेदार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा अनुभव केला शेअर
विशाखा सुभेदार या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो पोस्ट करुन म्हणतात, "ह्यावर्षी सुद्धा वर्षा वरून आमंत्रण आलं..बाप्पाचदर्शन,आरती आणि प्रसाद.महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री..जबरदस्त व्यक्तीमत्व एकनाथजी शिंदे साहेब.. आणि जातीने सगळ्यांची चौकशी करत असणारे श्रीकांत दादा शिंदे. आणि वहिनीसाहेब.आरती साठी साहेबांनी स्वतः टाळ घातला गळ्यात..किती साधे आणि प्रेमळ व्यक्तिमत्व..!
विशाखा सुभेदार पुढे लिहितात, "का माहित नाही,पण खुप वर्षी पूर्वी पासूनच, अगदी कळव्यात माहेरी असल्यापासूनच हे नाव जवळच वाटायचं.. करण माहेरची मी शिंदे ना... सगळं बालपण ठाणे कळवा इथे गेलं आणि शिंदे साहेबांची कर्मभूमी ठाणे जिह्वा त्यामुळे असेल हे..! आज वर्षा स्थानी जायला मिळालं ह्याचा आनंद आहे.. त्या बाप्पाचं दर्शन झालं.." अशी पोस्ट लिहून विशाखा सुभेदार यांनी त्यांचा अनुभव शेअर केलाय.