Join us

"वेगळा प्रवास, वेगळी भूमिका आणि...", सर्वोत्कृष्ट खलनायिका ठरल्यानंतर विशाखा सुभेदारची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 1:41 PM

'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४' हा सोहळा रविवारी १७ नोव्हेंबरला मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.

Vishakha Subhedar : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदारची ख्याती आहे. आपल्या अभिनयाला विनोदाची झालर देत तिनं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'फु बाई फु' यांसारख्या कार्यक्रमांमधून काम करत अभिनेत्री नावारूपाला आली. विशाखानं अनेक नाटक, मालिका आणि कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे.

सध्या विशाखा ही स्टार प्रवाहवरील 'शुभविवाह' या मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेत ती रागिणी आत्या ही भूमिका साकारत आहे. एका वेगळ्या भूमिकेच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या समोर आली. नुकताच 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४' हा सोहळा  १७ नोव्हेंबर रोजी मोठ्या दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात  दिग्गजांनी हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यात ‘शुभविवाह’ मधील रागिणी पात्र साकारलेली अभिनेत्री विशाखा सुभेदारला यंदाचा सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार  प्रदान करण्यात आला. 

अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळाल्यानंतर तिने सोशल मीडियावर या पुरस्कार सोहळ्यातील खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यावेळी तिने कॅप्शनमध्ये विशाखा म्हणते...  वेगळा प्रवास, वेगळी भूमिका ..आणि "सर्वोत्कृष्ट खलनायिका" हे अवॉर्ड.... रागिणी ( मालिका- शुभविवाह ) खुप आनंद झाला. Thank u  निर्माते महेश तागडे. दिग्दर्शक भरत गायकवाड, विश्वास सुतार, आणि अनिरुद्ध शिंदे, संपूर्ण कथानक फुलवणारे शिरीष लाटकर दादा आणि मुखी संवाद पेरणाऱ्या मिथिला सुभाष ताई (रागिणीची आई आणि माझे सहकलाकार विजय पटवर्धन, शितल शुक्ला, यशोमन आपटे, मधुरा देशपांडे, अभिजीत श्वेतचंद्र , कुंजिका, काजल पाटील, अक्षयराज,मनोज कोल्हटकर,रुचिर, राजेश साळवी, सगळ्या सगळ्यांचे आभार. tell a tale production house चा Hop अजित सावंत, स्वाती दरणे creative head.आणि स्टारप्रवाह. खुप आनंद आणि असेच प्रयत्न करीत राहीन. सोहळ्यात सादरीकरण करताना सुद्धा मज्जा आली.. ही संधी दिल्याबद्दल श्रीप्रसाद क्षिरसागर, चिन्मय कुलकर्णी (लेखक )विशाल मोढवे आणि सतीश सर. ह्यांचे मनापासून आभार.

विशाखा सुभेदारबरोबरच ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील सावनी म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरदेखील सर्वोत्कृष्ट खलनायिका ठरली. ‘ठरलं तर मग’ ही मालिका यंदाची ‘स्टार प्रवाह महामालिका’ ठरली. तर अभिनेत्री तेजश्री प्रधानला तिने साकारलेल्या मुक्ता या पात्रासाठी सर्वोत्कृष्ट आईचा पुरस्कार मिळाला.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रास्टार प्रवाह