Join us

ओव्हरटेक करून पुढे गेलेल्या कार चालकाला विशाखाने शिकवला चांगलाच धडा, म्हणाली- "त्याचा अहंकार दुखावला आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 15:20 IST

विशाखा सुभेदारने महिला दिनानिमित्त तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग शेअर केला आहे. विशाखाने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत हा प्रसंग सांगितला आहे.

आज जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. अनेक सेलिब्रिटीही महिला दिनानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आहेत. अभिनेत्री विशाखा सुभेदारने महिला दिनानिमित्त तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग शेअर केला आहे. विशाखाने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत हा प्रसंग सांगितला आहे. या व्हिडिओत विशाखा गाडी चालवत आहे. 

ती म्हणते, "लेडी ड्रायव्हर म्हटल्यावर लोक हलक्यात घेतात. तसंच त्यांचा अहंकारही दुखावतो. ही काय मला क्रॉस करणार असं त्यांचं होतं. एकदा मी शूटिंगला जात होते. माझ्यामागे एक स्कॉर्पिओ होती. आणि माझी नॅनो होती. तर माझ्या नॅनोने स्कॉर्पिओला ओव्हरटेक केलं. त्यात महिला ड्रायव्हर आहे म्हटल्यावर त्याचा अहंकार इतका दुखावला. ही कशी काय मला ओव्हरटेक करू शकते, असं त्याचं झालं. त्यानंतर त्याने पुढे जाऊन मला ओव्हरटेक केलं. कट वगैरे मारून तो पुढे जाऊन जिंकल्यासारख्या अविर्भावात एका सिग्नलला जाऊन थांबला. मी पुढे जाऊन काच खाली केली आणि त्याला म्हटलं की मला थोडं बोलायचं आहे. मी म्हटलं अरे तुम्ही अजून इथेच आहात. मला वाटलं तुम्ही आईच्या गावात पोहोचला असाल".

दरम्यान, विशाखाने नुकतीच नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. तिने टाटा कंपनीची नेक्सॉन ही गाडी घरी आणली. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली. विशाखा सध्या 'शुभविवाह' मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे.  

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी