Join us  

Vishal Pandey : बिग बॉसमध्ये विशालला मारहाण; आईला आलं रडू, बाबांनी जोडले हात, म्हणाले, "माझा मुलगा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 12:12 PM

Vishal Pandey And Armaan Malik : अरमान मलिकने शोचा सर्वात मोठा नियम मोडला असून विशाल पांडेच्या कानशिलात लगावली आहे.

बिग बॉस OTT 3 मध्ये सध्या खूप गोंधळ सुरू आहे. YouTuber अरमान मलिकने शोचा सर्वात मोठा नियम मोडला असून विशाल पांडेच्या कानशिलात लगावली आहे. वीकेंड का वार एपिसोडमध्ये, अरमानची पहिली पत्नी पायल आली आणि तिने विशाल कृतिकाकडे चुकीच्या दृष्टीकोनातून पाहत असल्याचा खुलासा केला.

पायलने सांगितलं की, विशालने कृतिकाबद्दल म्हटलं होतं - वहिनी छान दिसत आहेत. मात्र, विशालने माफी मागितली आणि आपला कोणताही चुकीचा हेतू नसल्याचं सांगितलं. पण दुसरी पत्नी कृतिकाबद्दल हे सर्व ऐकल्यानंतर अरमान मलिक इतका संतापला की त्याने विशालच्या कानशिलात लगावली. 

बिग बॉसने त्यानंतर हा निर्णय घरातील सदस्यांवर सोपवला आणि घरातील सदस्यांनी अरमानला विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेतला. विशालवर हात उचलूनही अरमानला शोमधून बाहेर काढण्यात आलं नाही. उलट संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट असण्याची शिक्षा झाली. मात्र शोमध्ये आपल्या मुलाला मारल्याचं पाहून विशालचे आई-वडील रडत आहेत. त्यांनी हात जोडून निर्मात्यांना आपल्या मुलाला न्याय देण्याची विनंती केली आहे.

विशालची आई म्हणाली - "बिग बॉस, मी तुम्हाला विनंती करते की, त्या व्यक्तीला घरातून हाकलून द्या, ज्याने माझ्या मुलावर हात उचलला आहे. आजपर्यंत आम्ही त्याच्यावर कधी हात उचलला नाही, इतकं प्रेमाने वाढवलं ​​आहे. हे आम्हाला अजिबात सहन होत नाही. जेव्हापासून मी हे ऐकले तेव्हापासून माझ्या मनाला खूप वाईट वाटलं आहे." विशालची आई हे म्हणताना रडू लागली. त्याचवेळी त्याच्या वडिलांनी आपल्या मुलावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. 

"मला एक गोष्ट सांगा की, एखाद्याची स्तुती करणं चुकीचं कसं असू शकते? माझ्या मुलाचा स्वभाव तसा नाही. अरमानने माझ्या मुलाच्या कानाखाली मारली आहे. त्यासाठी मी निर्मात्यांना आणि बिग बॉसला हात जोडून विनंती करतो की त्यांनी क्रिमिनलला बाहेर काढावं. आमचं कुटुंब तसं नाही. आम्ही खूप साधी माणसं आहोत. माझा मुलगा आपल्या मेहनतीने इथपर्यंत पोहोचला आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे" असं विशालच्या वडिलांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :बिग बॉस