Join us

चित्राच्या आत्महत्या प्रकरणाला लागलं वेगळं वळण, पोलिसांनी अभिनेत्रीच्या पतीला केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 2:01 PM

दक्षिणची लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री वीजे चित्रा यांचे पती हेमंतला चेन्नई पोलिसांनी ताब्यात घेतले.

दक्षिणची लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री वीजे चित्रा यांचे पती हेमंतला चेन्नई पोलिसांनी ताब्यात घेतले. चित्रा यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा हेमंतवर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हेमंतविरूद्ध पुरावेही गोळा करण्यास सुरवात केली आहे. 9 डिसेंबरला चित्रा हॉटेलच्या खोलीत मृत अवस्थेत आढळली होत्या. 28 वर्षीय चित्रा यांनी प्रसिद्ध टीव्ही सीरियल 'पांडियन स्टोर्स' मध्ये काम केले, त्यानंतर त्या बरीच प्रसिद्ध झाल्या.

पोलिसांनी म्हटले आहे की हेमंतला टीव्ही सीरियलमध्ये इंटिमेट सीन्स करणे पसंत नव्हते. यासह, रिअॅलिटी टीव्ही कार्यक्रमातही चित्राचे काम करणे हेमंतला आवडले नाही. या प्रकरणावर चित्रा आणि हेमंत यांच्यातही बरेच वादविवाद झाले. चित्राच्या आई विजयाने आरोप केला आहे की, आपली मुलगी कधीही फाशी लावून घेऊन शकत नाही, परंतु हेमंतने तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले.

चित्रा आणि हेमंतना यांनी 2 महिन्यांपूर्वीच आपल्या लग्नासाठी रजिस्ट्रेशन केले होते. यानंतर, जानेवारीत पारंपरिक पद्धतीने लग्न आणि रिसेप्शन देण्याचा प्लान होता. ईव्हीपी फिल्म सिटीमध्ये शुटींग आटोपून चित्रा मध्यरात्री 2.30 वाजता आपल्या हॉटेलमधील रुममध्ये आल्या होता. हॉटेलमध्ये भावी पती हेमंत यांच्यासमवेत त्या राहात होत्या. हेमंत यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, शुटींगवरुन परतल्यानंतर चित्राने अंघोळीसाठी जात असल्याचं सांगितल. मात्र, खूप वेळानंतरही त्या बाथरुममधून बाहेर येत नसल्याचे लक्षात येताच हेमंत यांनी दरवाजा ठोठावला. तरीही, चित्राकडून काहीच प्रतिक्रिया न मिळाल्याने हेमंत यांनी हॉटेल स्टाफला यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर, डुप्लीकेट चावीने हॉटेल रुममधील तो दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी, सिलींगला चित्राचा मृतदेह लटकलेला आढळून आला. चित्राचा पती हेमंत पोलीस कोठडीत आहे.