'व्हॉइस ऑफ इंडिया' फेम गायक मोहम्मद जाकिर हुसैन (Mohammed Zakir Hussain) यांचं निधन झालं आहे. त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. बिलासपुर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले गेले मात्र ते अपयशी ठरले. त्यांच्या निधनाने संगीत जगत शोकसागरात बुडाले आहे. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
आपल्या आवाजाची जादू पसरवणारे मोहम्मद जाकिर हुसैन आपल्या कुटुंबासोबत बिलासपुर येथे गेले होते. त्यांची तब्येत अचानक खराब झाली. माध्यम रिपोर्ट्सनुसार, त्यांना हार्टअटॅक आला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच पुरानी बस्ती, रानी रोड धनवार पारा स्थित आवास येथील त्यांचे परिजन आले. त्यांचे पार्थिव बिलासपुर वरुन छत्तीसगढ येथील कोरबा येथे आणण्यात आले. त्यांच्या आवाजाची जादूच अशी होती की हजारो लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले.
गायक मोहम्मद जाकिर हुसैन हे लहानपणापासूनच संगीत आणि कला क्षेत्रात होते. त्यांना गायनाची आधीपासूनच आवड होती. त्यांचं बालपण कोरबा येथेच गेलं. नंतर त्यांना व्हॉइस ऑफ इंडियामध्ये संधी मिळाली. इथे त्यांनी आपल्या आवाजाने सर्वांचंच मन जिंकलं. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.