जवळपास तीस वर्षांनंतर 'वागले की दुनिया' मालिका नवीन पिढीचे नवीन किस्से घेऊन छोट्या पडद्यावर येत आहे. ८०च्या दशकाच्या शेवटी दूरदर्शनवर प्रसारीत झालेली वागले की दुनिया ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेत शीर्षक असलेली भूमिका साकारणारे अभिनेते अंजन श्रीवास्तव 'वागले' म्हणून प्रसिद्ध झाले होते. तसेच अरुण गोविल 'राम', नीतिश भारद्वाज 'कृष्ण' आणि रघुवीर यादव 'मुंगेरी लाल' म्हणून प्रचलित झाले होते. मात्र यावेळी 'वागले की दुनिया'मध्ये 'वागले'च्या भूमिकेत अंजन श्रीवास्तव आणि त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत भारती आचरेकर दिसणार आहेत. तर या दोघांच्या मुलाच्या भूमिकेत सुमीत राघवन दिसणार आहे.
'वागले की दुनिया' आजच्या मध्यमवर्गीय व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षांना दाखवते. कथेने काहीशी झेप घेतली आहे आणि वागले व कुटुंबाच्या नवीन पिढीच्या आजच्या काळामध्ये स्थित आहे. मालिका आजच्या मध्यमवर्गीयांची प्रबळ संस्कार व विनम्र संगोपनाला, तसेच त्यांचे रोजचे जीवन व समस्यांना सादर करते. 'वागले की दुनिया'चा नवीन अध्याय पाहण्यासाठी सज्ज राहा, जेथे कुटुंब नवीन पटकथेसह टेलिव्हिजनवर परतत आहे.
जुन्या आठवणींना उजाळा देत सोनी सब लवकरच 'वागले की दुनिया - नयी पिढी, नये किस्से' सादर करणार आहे.