अभिनेता कुशल पंजाबीच्या निधनाच्या धक्क्यातून टीव्ही इंडस्ट्री अद्यापही सावलेली नसताना, आता एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. कुशलने वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी गळफास घेत आत्महत्या केली. माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबादार ठरवू नये, असे आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या नोटमध्ये म्हटले आहे. पण या आत्महत्येचे खरे कारण म्हणजे, वैवाहिक आयुष्यातील कलहामुळे कुशल डिप्रेशनमध्ये होता. आता एक वेगळी माहिती म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी कुशलने पत्नी आणि मुलाची भेट घेतली होती. ‘स्पॉटबॉय-ई’ने याबद्दलचे वृत्त दिले आहे. त्यानुसार कुशल आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या वर्षभरापासून वाद विकोपाला पोहोचले होते. गत 3 वर्षांपासून दोघेही वेगवेगळे राहत होते. कुशल मुंबईत राहत होता. तर त्याची पत्नी आपल्या मुलाला घेऊन शंघाईला राहत होती. पण कुशलला वाद संपवून पुन्हा एकदा पत्नी व मुलासोबत राहायचे होते.
कदाचित म्हणूनच आत्महत्या करण्यापूर्वी नात्यातला दुरावा दूर करण्यासाठी कुशल पत्नी आणि मुलाला भेटण्याला शंघाई येथे गेला होता. सूत्रांच्या माहितीनुसार कुशल त्याच्या पत्नीशी बोलण्यासाठी आणि त्याच्या नात्याला एक संधी देण्यासाठी शंघाईला गेला होता. मात्र त्याच्या पत्नीने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. कुशलने ही गोष्ट त्याच्या मित्रांपासून लपवली होती.
4 वर्षांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर 2015 मध्ये त्याने Audrey Dolhen हिच्यासोबत लग्न केले होते. दोघांना एक मुलगा आहे. कुशल मुलावर प्रचंड प्रेम करायचा. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर मुलासोबतचा फोटो शेअर केला होता. इन्स्टा स्टोरीवर त्याने मुलाचा फोटो शेअर करत सोबत हार्ट शेप इमोजी पोस्ट केला होता. ही त्याची अखेरची पोस्ट होती. कुशल एक शानदार अभिनेता होताच. शिवाय कुटुंबावर प्रेम करणारा पती, पिता आणि एक जिंदादील व्यक्ती होता.
‘जोर का झटका- टोटल वाइपआऊट’ हा रिअॅलिटी गेम शो त्याने जिंकला होता. बक्षिसाच्या रकमेपोटी त्याला 50 लाख रूपये जिंकली होते. अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही त्याने काम केले.
कुशल सिंधी कुटुंबात जन्मला होता. लहानपणापासून त्याला सायकलिंग, स्केटिंग, स्वीमिंग, डान्सिंगची आवड होती. अॅडवेंचर्स स्पोर्ट म्हणजे त्याचा जीव की प्राण होता. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच जॅज आणि हिप हॉप डान्स फॉर्ममध्ये तो एक्सपर्ट होता. ट्रॅव्हलिंग आणि आऊटडोर स्पोर्टची त्याला प्रचंड आवड होती.