Join us

'लक्ष्मीनिवास'मध्ये लगीनघाई, भूतकाळातील कटू आठवणींमुळे लक्ष्मीला वाटतेय जयंतरावांची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:16 IST

Lakshmi Nivas Serial : 'लक्ष्मी निवास' या महामालिकेत भव्य मंगलकार्यची जय्यत तयारी सुरु झाली आहे.

'लक्ष्मी निवास' (Lakshmi Nivas Serial) या महामालिकेत भव्य मंगलकार्यची जय्यत तयारी सुरु झाली आहे. जयंत आणि जान्हवी कुटुंबासोबत पूजा पार पाडतात, तर दुसऱ्या बाजूला सिद्धूही भावनासाठी पूजा करतो. लक्ष्मी हुशारीने रवी आणि सुपर्णाला आनंदीला भावनाकडे द्यायला सांगते. आनंदीला घरी घेऊन आल्यावर संतोष भावनासोबत वाद घालतो, पण लक्ष्मी आणि श्रीनिवासचा भावनाला संपूर्ण सपोर्ट आहे. 

दुसरीकडे सिद्धू आईने सुचवलेल्या मुलींना नाकारतोय. तेवढ्यात त्याला भावनाकडून फोन येतो, आणि ती त्याचे आभार मानते. जयंत आणि श्रीनिवास एकमेकांना लग्नाची पत्रिका देतात. जान्हवी आपल्या लग्नाची पत्रिका विश्वाला पोहोचण्याचा प्रयत्न करते, पण तो तिला प्रतिसाद देत नाहीये. लक्ष्मी सिद्धूलादेखील लग्नाचं आमंत्रण देते. लक्ष्मीला जान्हवीच्या लग्नाची काळजी आहे. पण श्रीनिवास तिला शांत करत धीर देतो. भावनाच्या लग्नात घडलेली घटना लक्ष्मीला आठवते. त्यामुळे लक्ष्मीला जयंत  रावांची खूप काळजी वाटते आहे. सगळे जयंत आणि जान्हवीच्या लग्नासाठी निघताना भावुक होतात. 

मालिकेचा प्रोमो समोर आला आहे, त्यात पाहायला मिळतंय की, सिंचनाच्या माहेरी लक्ष्मी आणि श्रीनिवास जान्हवीच्या लग्नाची पत्रिका घेऊन जातात. त्यांना लग्नाचे निमंत्रण देतात. ते गेल्यानंतर सिद्धूला कळतं की, ते लोक लग्नाला जाणार आहेत. त्यावर सिद्धू संतापतो आणि म्हणतो की, या घरात मला काही किंमत आहे की नाही. कुणीच का ऐकत नाहीये माझं. तिथे जायचं म्हणजे स्वाभिमान बाजूला ठेवायचं. तर दुसरीकडे लक्ष्मीला जयंतरावांची काळजी वाटतेय. श्रीकांतच्या कटू आठवणींमुळे लक्ष्मी जयंतला सांगते की, पुढचे काही दिवस गरज नसेल तर तुमच्या गाडीने प्रवास करू नका. जयंत आणि जान्हवीचे लग्न निर्विघ्नपणे पार पडणार का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.