Join us

‘कुंडली भाग्य’मध्ये बाप्पांचा जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2017 10:02 AM

कुंडली भाग्य’ या मालिकेमध्ये गणेश चतुर्थीचा सण ‘जय गणेश देवा’ नावाने धूमधडाक्यात साजरा केला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ...

कुंडली भाग्य’ या मालिकेमध्ये गणेश चतुर्थीचा सण ‘जय गणेश देवा’ नावाने धूमधडाक्यात साजरा केला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात श्रींचे आगमन हे टीव्हीवरील सर्व अग्रगण्य कलाकार बॉलीवूडमधील सेलिब्रिटींच्या समवेत साजरे करतील. सध्या कुंडली भाग्यमध्ये सुरू असलेल्या नाट्य़पूर्ण घडामोडींदरम्यानच हा उत्सव साजरा केला जात आहे. ऋषभ आणि करण लुथ्रा (अनुक्रमे मनीत जौरा आणि धीरज धूपर) हे गणेश चतुर्थीचा सण साजरा करण्यासाठी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करतात. हा उत्सव जोरदार साजरा होत असतो आणि प्रत्येकजण त्यात रममाण झालेला असतो, तेव्हा इतरांच्या नकळत करण आणि प्रीता (श्रध्दा आर्य) हे परस्परांकडे आकर्षित होतात आणि त्यांच्यात प्रेमाची ठिणगी पडते.या विशेष भागात अभिनेता वरूण धवन एक धमाकेदार कार्यक्रम सादर करताना दिसेल. यात तो आपल्या आगामी ‘जुडवा-2’ चित्रपटातील ‘गणपती बाप्पा मोरया’ या गाण्यावर नृत्य सादर करणार आहे. त्यानंतर बॉलीवूडमधील ज्येष्ठ कलाकार जीतेंद्र हे गणेश महा आरतीत सहभागी होतील आणि त्यांच्याबरोबर कुंडली भाग्यमधील मनीत जौरा, श्रध्दा आर्य, धीरज धूपर आणि अंजुम फकीह हे सर्व प्रमुख कलाकारही असतील. या आरतीनंतर दिव्यांका त्रिपाठी, दीपिका कक्कर तसेच संजिदा शेख या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय नायिका तसेच अंजुम फकीह या यावेळी अनुक्रमे हे शुभ्रम, नागडे संग ढोल, अलबेला साजन आणि डोला रे डोला या गाण्यांवर नृत्य सादर करताना दिसतील. यानंतर लैला मैं लैला, ट्रिप्पी ट्रिप्पी, चंद्रलेखा आणि सारा जमाना या गाण्यांवर मादक रूपवती गौहर खान धमाकेदार नृत्य सादर करून कार्यक्रमाचा ज्वर वाढवील.‘ऐसी दीवानगी… देखी नहीं कहीं’ या मालिकेतील प्रणव मिश्रा आणि ज्योती शर्मा हे नायक-नायिका एक धमाकेदार प्रवेश घेऊन ‘कह दूँ तुम्हे’ या गाण्यावर एक सळसळते नृत्य सादर करतील. त्यांच्यापाठोपाठ ‘पिया अलबेला’ मालिकेतील पूजा आणि नरेन (शीन दास आणि अक्षय म्हात्रे) ही जोडी ‘दिल क्या करें’ या गाण्यावर जे रोमँटिक नृत्य-नाट्य़ सादर करतील, त्यातील त्यांचे भावनिक नाते पाहून प्रेक्षक त्यांच्या प्रेमात पडतील. यानंतर ‘जीत गयी तो पिया मोरे’ या नव्या मालिकेतील नायक कृप सुरी आणि नवी नायिका येशा रुघानी हे ‘राबता’ या गाण्यावर सादर करण्यात आलेल्या नृत्यामुळे सर्वांनाच मंत्रमुग्ध करून सोडतील. यानंतर दिव्यांका त्रिपाठी, विवेक दाहिया, रवी दुबे आणि अर्जुन बिजलानी हे हवा हवा, सज्जन रेडियो, तम्मा तम्मा आणि गलती से मिस्टेक या धमाकेदार गाण्यावरील नृत्यामुळे सादर करतील त्यामुळे या कार्यक्रमातील ऊर्जा शिगेला पोहोचेल.