ंदी प्रमाणे सोनी मराठी वाहिनी पहिल्यांदाच 'इंडियन आयडॉल - मराठी' घेऊन येते आहे. 'इंडियन आयडॉल - मराठी'मुळे स्पर्धकांच्या कलागुणांना वाव मिळेल आणि प्रेक्षकांचं मनोरंजनही होईल.आता 'इंडियन आयडॉल - मराठी' या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातला आवाज घराघरांत पोचणार आहे आणि आपली कला सादर करण्यासाठी स्पर्धकांना हक्काचा मंच मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीच्या प्रेक्षकांना 'इंडियन आयडॉल - मराठी' लवकरच पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये 'अजय-अतुल' हे परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
या शोचे सुत्रसंचालन कोण करणार याकडेही चाहत्यांचे लक्ष लागले होते. अखेर या शोला सूत्रसंचालन करण्यासाठी शोध सुरु होता. तो शोधही पूर्ण झाला आहे. या शोला सूत्रसंचालनाच्या भूमिकेत स्वानंदी टिकेकर झळकणार आहे. खुद्द स्वानंदीनेच सोशल मीडियावर तिचा आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे. 22 नोव्हेंबरपासून सोनी मराठीवर इंडियन आयडल मराठीला सुरुवात होणार आहे. शोची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये या शोसाठी कमालीची उत्सुकता होती.
मुळातच गाणं हा विषयच स्वानंदीच्या खूप जवळचा आहे.स्वानंदी टिकेकरने छोट्या पडद्यावर दिल दोस्ती दुनियादारी मालिकेत झळकली होती. या मालिकेतून तिला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. आजही ती याच मालिकेमुळे जास्त ओळखली जाते. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती उत्तम गायिका देखील आहे.स्वानंदीची आई प्रसिद्ध गायिका आहे. आरती अंकलीकर टिकेकर स्वानंदीच्या आईचे नाव. स्वानंदीला लहानपणापासूनच गायनाची आवड होती. गाण्याचा वारसा हा तिच्या आईकडूनच तिला मिळाला आहे. तर अभिनयाचा तिचे वडिल उदय टिकेकर यांच्या कडून मिळाला आहे.
सूत्रसंचालन करताना एक अभिनेत्री म्हणून नाही तर स्वानंदी म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.त्यामुळे नवीन भूमिकेत तिला पाहण्याची तिच्या चाहत्यांनाही कमालीची उत्सुकता असणार हे मात्र नक्की. आता मराठीमध्ये इंडियन आयडल कितपत रसिकांची पसंती मिळवतो हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.