Join us  

तणाव घालवण्यासाठी समीक्षा काय करते?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2016 4:59 PM

तणाव दूर करण्यासाठी कोणी गाणे ऐकतं, तर कोणी पुस्तक वाचते. तर स्विमिंग केल्यानंतर काहींचा तणाव दूर होतो. पण समीक्षा ...

तणाव दूर करण्यासाठी कोणी गाणे ऐकतं, तर कोणी पुस्तक वाचते. तर स्विमिंग केल्यानंतर काहींचा तणाव दूर होतो. पण समीक्षा जैस्वालला तणाव दूर करायचा असल्यास ती जेवण बनवते.जिंदगी की महक या मालिकेत महकला जेवण बनवायला खूप आवडते असे दाखवण्यात आले आहे. महेकची भूमिका साकारणारी समीक्षा जैस्वालला खऱ्या आयुष्यातही जेवण बनवायला खूप आवडते. तिला वेगवेगळे पदार्थ बनवायला खूप आवडतात. ती सांगते, "कुकिंग ही माझी हॉबी आहे. मी कितीही टेन्शनमध्ये असली तरी एकदा किचनमध्ये शिरली की, माझा सगळा तणाव दूर होतो. मला सगळ्या पद्धतीचे जेवण बनवता येते. मी भारतीय, चायनिज, थाय, कॉन्टिनेटल सगळ्याच प्रकारचे जेवण खूप चांगले बनवते. मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यानही काही वेळ असल्यास मी सेटवरच्या किचनमध्ये जाऊन काही ना काही तरी बनवते. मला जेवण बनवायला आवडते हे माझ्या टीममधील सगळ्यांनाच माहीत आहे. मी केलेले जेवण सगळ्यांना खूपच आवडते. माझ्या मित्रांनी, नातलगांनी माझ्या जेवणाचे कौतुक केले की मला खूप आवडते. मला कित्येक दिवसांपासून माझ्या सहकलाकारांना पार्टी द्यायची होती. पण चित्रीकरणाच्या व्यग्र शेड्युलमुळे मला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे मी चित्रीकरणातून वेळ काढून दाल मखनी, खीर, व्हेजिटेबल राईस आणि पनीरची भाजी स्वतः बनवली आणि सगळ्यांना छान पार्टी दिली. सगळ्यांना मी केलेले जेवण इतके आवडले की, त्यांनी माझे शेफ समीक्षा असे नामकरण केले आहे. सगळ्यांसाठी जेवण बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली होती. पण सगळ्यांना जेवण आवडल्याने मी खूप खूश झाले.