Join us

मालिका संपल्यानंतर 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड सध्या काय करतोय?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 16:57 IST

Kiran Gaikwad : देवमाणूस मालिकेत डॉ. अजित कुमार यांची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड सध्या काय करतो, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

छोट्या पडद्यावरील 'देवमाणूस' (Devmanus) या मालिकेनं अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील सर्व कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकेचे पहिले पर्व यशस्वी झाल्यानंतर दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. दुसरा सीझन संपल्यानंतर प्रेक्षक भावुक झाले होते. या मालिकेत डॉ. अजित कुमार यांची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) सध्या काय करतो, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

अभिनेता किरण गायकवाड सध्या त्याच्या युट्यूब चॅनेलवर सक्रिय असतो. मालिका संपल्यानंतर किरण गायकवाडने त्याच्या युट्यूब चॅनेवर अनेक व्लॉग शेअर केले आहेत. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याचा वेगळा लूक पाहायला मिळतो आहे. क्लिन शेव्ह केल्यानंतर त्याच्या लूकमध्ये बराच बदल झाल्याचं दिसून येतंय.किरण गायकवाडने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर चाहत्यांनी क्लिन शेव्ह करू नको, तुला हा शोभत नाही, असा सल्ला दिला आहे.

भिजत नाही भाजत पाहिलाय देवकुंड हा व्हिडिओ त्याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. महाराष्ट्रातल्या देवकुंड धबधब्याचं तरुणाईला विशेष आकर्षण आहे. पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत असतात. पण किरणने हा ट्रेक उन्हाळ्यात केलाय. त्याचा या ट्रेकचा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

किरण गायकवाडच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, 'लागिरं झालं जी' या मालिकेत त्याने भैय्यासाहेब ही भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते.

टॅग्स :किरण गायकवाड'देवमाणूस २' मालिका