Join us  

​मॉनीसोबत लग्न करण्याबद्दल पाहा मोहित काय म्हणतोय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2016 12:38 PM

मॉनी रॉय आणि मोहित रैना यांची ओळख देवों के देव महादेव या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या ...

मॉनी रॉय आणि मोहित रैना यांची ओळख देवों के देव महादेव या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असे म्हटले जाते. त्या दोघांना या मालिकेचे चित्रीकरण संपल्यानंतरही अनेकवेळा एकत्र पाहाण्यात आले आहे. मॉनीच्या वाढदिवसालाही मोहित सतत तिच्यासोबत होता. हे सगळे पाहाता या दोघांच्या नात्याची चर्चा नेहमीच मीडियात होत असते. मॉनी आणि मोहितने आता लग्नबंधनात अडकण्याचा विचार केला असून 2017ला ते दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत आहेत. मॉनी आणि मोहितला प्रचंड फॅन फॉलॉविंग असल्याने या बातम्या आल्यापासून या दोघांचे फॅन्स खूपच खूश आहेत. पण असे काहीही नसून अद्याप तरी लग्नाचा विचार नाही असे स्वतः मोहितने स्पष्ट केले आहे.  या केवळ अफवा असल्याचे मोहितचे म्हणणे आहे. याविषयी मोहित सांगतो, "माझे वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्य  वेगवेगळे ठेवायला मला आवडते. त्यामुळे मी माझ्या कुटुंबीयांना नेहमीच मीडियापासून दूर ठेवतो. माझ्या मालिकांना प्रसिद्धी मिळाल्यानंतर माझ्या कुटुंबियांना पाहाण्याची माझ्या फॅन्सनची अनेक वर्षांपासून इच्छा आहे. माझ्या कुटुंबीयांना कॅमेऱ्यासमोर आणण्यासाठी अनेकवेळा ते विनंत्यादेखील करतात. पण तरीही मी त्यांना झगमगाटाच्या दुनियेपासून दूर ठेवतो. इतके सगळे करूनही माझ्याबाबत अफवा कोण पसरवत आहे हेच मला कळत नाहीये. मी 2017 मध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्या मला गेल्या कित्येक दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. पण हे सगळे चुकीचे असल्याचे मी माझ्या फॅन्सला सांगू इच्छितो. मला लग्न तर करायचे आहेच. पण सध्या तरी लग्न करण्याची मला काहीही घाई लागलेली नाही."