Join us

​ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील नैतिक म्हणजेच विशाल सिंग पडला प्रेमात?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2016 11:09 AM

विशाल सिंगने देख भाई देख, परिचय यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या तो ये रिश्ता क्या कहलाता है ...

विशाल सिंगने देख भाई देख, परिचय यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या तो ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकत आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नैतिकची भूमिका पूर्वी करण मेहरा साकारत होता. पण करणने तब्येतीच्या कारणामुळे या मालिकेला रामराम ठोकला. करणने ही मालिका सोडल्यानंतर जवळजवळ दोन महिने तरी नैतिकची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळाली नव्हती. करणची लोकप्रियता पाहाता त्याला मालिकेत परत आणण्याचा प्रयत्न प्रोडक्शन टीम करत होती. पण करणने पुनरागमन करण्यास नकार दिल्यानंतर या मालिकेत करणची जागा विशाल सिंगने घेतली. विशालने काहीच दिवसांत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. प्रेक्षकांना हा नवीन नैतिक खूपच आवडत आहे. या नव्या नैतिकच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. नैतिक म्हणजेच विशाल सिंग सध्या प्रेमात पडला असल्याची चर्चा आहे. विशाल आणि लौट आओ त्रिशा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारलेली अदिता वाही यांना सध्या अनेक ठिकाणी एकत्र पाहायला मिळत आहे. अदिता आणि विशाल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले फ्रेंड्स आहेत. पण आता त्यांच्या मैत्रींचे रूपांतर प्रेमात झाले असल्याची चर्चा आहे. पण ते दोघेही आपले नाते मीडियापासून लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत विशालची एंट्री होण्यापूर्वी अदिताने ट्विटरवर त्याला शुभेच्छादेखील दिल्या होत्या. तसेच ट्विटरवर या मालिकेबाबतच्या पोस्ट ती नेहमीच शेअर करत असते.