'ये रिश्ता क्या कहलाता है' कपलचे सिजलिंग फोटोशूट तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 08:40 AM2018-01-23T08:40:21+5:302018-01-23T14:10:21+5:30

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे कार्तिक आणि नायरा म्हणजेच मोहसीन खान आणि शिवांगी  पुन्हा एकदा ...

'What is this relation?' Do you see couples' seizing photoshoots? | 'ये रिश्ता क्या कहलाता है' कपलचे सिजलिंग फोटोशूट तुम्ही पाहिलेत का?

'ये रिश्ता क्या कहलाता है' कपलचे सिजलिंग फोटोशूट तुम्ही पाहिलेत का?

googlenewsNext
'
;ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे कार्तिक आणि नायरा म्हणजेच मोहसीन खान आणि शिवांगी  पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी ते त्यांच्या रंगणा-या प्रेमकथेमुळे नाहीतर एका फोटोशूटमुळे दोघांवर चर्चा रंगत आहे. नुकतेच या दोघांनी एक  फोटोशूट केले आहे.या फोटोशूटमध्ये दोघांचाही रोमँटीक अंदाज पाहायला मिळतो आहे. दोघेही त्यांच्या केमिस्ट्रीप्रमाणे अगदी स्टायलिश लूकमध्ये पाहायला मिळत आहेत.फोटोग्राफर प्रशांत समतानीने हे फोटोशूट केले आहेत.एरव्ही ऑनस्क्रीन एकमेकांच्या अथांग प्रेमात बुडलेले नायरा ( शिवांगी जोशी)  आणि कार्तिक( मोहसिन खान) खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत.या दोघांच्या अफेअरच्या अफवा कित्येक दिवसांपासून सुरू आहेत.पण त्यांनी याबाबत मौन राखणेच पसंत केले होते. पण आता त्यांच्या नात्याची कबुली मोहसिनने दिली आहे.ते दोघे काही महिन्यांपासून नात्यात असल्याचे मोहसिनने म्हटले आहे.





'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या सेटवर सध्या प्रेमाची जादू पाहायला मिळत आहे.लव्ह इज इन द एअर अशीच काहीशी परिस्थिती सेटवर निर्माण झाल्याच्या खुमासदार चर्चा सध्या रंगल्या आहेत. नायरा आणि कार्तिक यांची रिल लव्ह स्टोरी आता रियल लाइफमध्येही सुरु झाल्याचं बोललं जात असताना  ये रिश्ता क्या कहेलाता है या मालिकेत नक्ष ही भूमिका साकारणारा अभिनेता रिषी देव आणि मोहेना सिंग यांच्यात प्रेमाचं नातं जडू लागलं आहे. दोघंही एकमेकांना पसंत करत असून बराच काळ एकत्र घालवत आहेत. दोघांमधील हे प्रेमाचं नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट बनत चाललं आहे. निव्वळ मैत्री या शब्दांपलीकडे या दोघांच्या नात्याकडे पाहिलं जात आहे. रिषी आणि मोहेना यांच्यातील या प्रेमाच्या नात्याची आणि दोघंही एकत्र बराच काळ घालवत असल्याची कल्पना मालिकेच्या सेटवरही प्रत्येकाला कल्पना आलीच आहे.एकमेकांसाठी खूप स्पेशल असल्याची कबूली दोघांनीही दिली आहे. असं असलं तरी आपण फक्त आणि फक्त चांगले मित्र असल्याचे हे दोघं सांगत असतात. 

Web Title: 'What is this relation?' Do you see couples' seizing photoshoots?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.