Join us

​ये रिश्ता क्या कहलाता है फेम करण मेहराच्या मुलाचा पहिला फोटो पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2017 6:00 AM

​ये रिश्ता क्या कहलाता या मालिकेत नैतिकची भूमिका साकारणाऱ्या करण मेहराला गेल्या आठवड्यात मुलगा झाला. मुलाचा फोटो त्याची पत्नी निशा रावळने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केला आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे करण मेहरा नावारूपाला आला. या मालिकेत त्याने साकारलेली नैतिक ही भूमिका खूपच गाजली होती. पण काहीच महिन्यांपूर्वी त्याने ही मालिका सोडली. यानंतर तो बिग बॉ़स या कार्यक्रमात झळकला होता. करणने अभिनेता निशा रवाळशी 2012मध्ये लग्न केले आहे. त्या दोघांची ओळख हसते हसते या मालिकेच्या सेटवर झाली होती. निशाला पाहताच क्षणी करण तिच्या प्रेमात पडला होता. सहा वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न केले. निशा आणि करणच्या आयुष्यात नुकताच एक चिमुकला आला आहे. निशाने काहीच दिवसांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला. निशा आणि करणने ही गोड बातमी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना दिली होती. त्याचसोबत त्याच्या चिमुकल्याच्या पायांचा फोटो पोस्ट केला होता आणि आता करण-निशाने त्यांच्या मुलांचा फोटो त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. तसेच त्याचे नाव या पोस्टद्वारे सगळ्यांना सांगितले आहे. निशाने शेअर केलेल्या फोटोत छोटेसे बाळ एका टोपलीत झोपलेले असल्याचे आपल्याला दिसत आहे. त्याचसोबत तिने एक पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने म्हटले आहे की, 14 जूनला हा गोंडस बेबी आमच्या आयुष्यात आला. आम्ही त्याची तुमच्यासोबत ओळख करून देत असून त्याचे नाव कविश असे आम्ही ठेवले आहे. करणने नुकतेच 'खटमले इश्क' या मालिकेत काम केले होते. तर निशाने 'मैं लक्ष्मी तेरे आंगन की', 'आने वाला पल', 'केसर' या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच करण आणि निशा रिअॅलिटी शो 'नच बलिए' मध्ये देखील झळकले होते. बाळाच्या येण्याने करण काही दिवस शूटिंगमधून ब्रेक घेणार आहे. बाळासोबत काही दिवस एन्जॉय करणार असल्यामुळे काही दिवस तरी तो छोट्या पडद्यापासून दूर राहाणार आहे.