गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढल्यानंतर भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे सगळेच आपल्या घरात राहून आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत होते. त्यावेळी लोकांच्या मागणीवरून रामानंद सागर यांची रामायण ही मालिका छोट्या पडद्यावर पुन्हा दाखवण्यात आली होती. या मालिकेने टीआरपीचे सगळे रेकॉर्ड गेल्यावर्षी मोडले होते आणि आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना रामायण पाहायला मिळणार आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा एकदा रामायण री-टेलिकास्ट होणार आहे.सध्या सगळीकडेच रामायणची चर्चा आहे आणि यासोबतच रामायण मधले कलाकारही पुन्हा एका चर्चेत आले आहेत. रामायणातील लव-कुश यांची भूमिका साकारणाऱ्या बालकारांचीही सध्या बरीच चर्चा होत आहे. लव- कुश भूमिका दोन मराठी मुलांनी साकारली होती. आज ही दोन्ही मुंल आपापल्या क्षेत्रात प्रचंड यशस्वी बनले आहेत. दोन्हीपैकी एक बनला प्रसिद्ध अभिनेता.तर दुसरा बनला प्रसिद्ध कंपनीचा CEO.
लवची भूमिका साकारणार स्वप्नील जोशी आज मराठी इंड्स्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता आहे.स्वप्नील सगळ्यांच्याच परिचयाचा आहे.मात्र कुश भूमिका साकाराणारा बालकलाकार रामायणनंतर लाईमलाईटमध्ये नव्हता. रामायणात कुशची भूमिका साकारणा-या बालकलाकाराचे नाव आहे मयुरेश क्षेत्रमाडे.मयुरेश सध्या न्यूजर्सीमध्ये राहतो. मयुरेश सध्या एका प्रायव्हेट कंपनीमध्ये CEO पदावर कार्यरत आहे. मयुरेश एक चांगला लेखक सुद्धा आहे. काही विदेशी लेखकांसोबत मिळून मयुरेशनं स्पाइस अँड डेव्हलपमेंट नावाचं एक पुस्तक सुद्धा लिहिलं आहे.
गेल्यावर्षी मयुरेशने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहीत आठवणींना उजाळा दिला होता. पाच वर्षांचा असताना अभिनयाला सुरुवात केली होती. १९८९ साली मला जेव्हा उत्तर रामायण पौराणिक मालिकेत कुशची भूमिकेसाठी माझे सिलेक्शन झाल्याचे कळाले तो दिवस आजही मला चांगला आठवतो. माझ्यासाठी तो दिवस माझ्या आयुष्यातला खूप खास दिवस असणार आहे.
३२ वर्षांपूर्वीचा तो दिवस आजही मला चांगला आठवतो. कुशची भूमिका साकारली तेव्हा मी फक्त १२ वर्षाचा होतो. अभिनय सोडल्यानंतर 1999 मध्ये मी अमेरिकेत आल्याचे त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहीले होते. रामायण री-टेलिकास्ट झाल्यामुळे पुन्हा एकदा ते दिवस आठवल्याचे त्याने सांगितले होते.