Join us

'आम्ही जे भोगलंय ते माझ्या बाळाच्या वाट्याला..', निवेदिता जोशींनी 'त्या' आठवणींना दिला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 3:27 PM

निवेदिता सराफ यांनी नुकताच ६०वा वाढदिवस साजरा केला. सध्या त्या भाग्य दिले तू मला या मालिकेत काम करत आहेत.

निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी नुकताच ६०वा वाढदिवस साजरा केला. सध्या त्या भाग्य दिले तू मला या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेच्या सेटवर ६० दिवे लावून त्यांचे औक्षण करण्यात आले होते. मालिकेच्या कलाकारांकडून त्यांना हे सरप्राईज मिळाले होते, हे पाहून निवेदिता सराफ भारावून गेल्या होत्या. 

निवेदिता सराफ यांचे वडील गजन जोशी हे मराठी चित्रपट अभिनेते होते तर त्यांच्या आई विमल जोशी या उत्तम निवेदिका तसेच मुलाखतकार म्हणून परिचयाच्या होत्या. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक वर्षे कार्यक्रमांचे सादरीकरण केले होते. निवदिता जेव्हा लहान होत्या तेव्हा त्यांच्या आई विमल जोशी नोकरीनिमित्त घराबाहेर असायच्या. गजन जोशी यांचे वयाच्या चाळीशीतच निधन झाले होते. त्यामुळे घरची जबाबदारी त्यांच्या आईवरच पडली होती. त्यामुळे नोकरी करणे हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर होता. आपल्या दोन्ही मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळत त्यांनी ही नोकरी निष्ठेने स्वीकारली. परंतु या नोकरीमुळे त्यांना घरासाठी आणि आपल्या मुलींसाठी वेळ देणे शक्य नव्हते. यादरम्यान जेव्हा त्यांना सुट्टी असायची तेव्हा मात्र निवेदिता खूप खुश असायच्या. कारण त्या दिवशी आई घरीच असल्याने त्यांना दाराचे कुलूप उघडायला लागायचे नाही. 

आई आपल्या जवळ असावी असे त्यांना त्यावेळी सतत वाटायचे मात्र यावर काहीच उपाय नव्हता. पण माझ्याकडे हा पर्याय होता. जेव्हा मी अशोक सराफ यांच्या सोबत लग्न केले त्यावेळी गरोदर असताना मी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचे ठरवले. आम्ही जे लहानपणी भोगलंय ते माझ्या बाळाच्या वाट्याला येऊ नये असे वारंवार वाटायचे. अशोक सराफ त्यावेळेला चित्रपटांमध्ये व्यस्त होते त्यामुळे मुलाला वेळ देणे त्यांना कदापि शक्य झाले नसते. म्हणूनच मी हा निर्णय घेतला. माझ्या अभिनयाच्या आवडीखातर मी माझ्या मुलाचे सुख हिरावून घेऊ इच्छित नव्हते. अशी एक गोड आठवण मराठी अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ शेअर केली आहे.

मराठी अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ जेव्हा अभिनयातून ब्रेक घेतला तेव्हा त्यांनी हंसगामीनी हा साड्यांचा ब्रँड बाजारात आणला होता. मात्र कालांतराने मुलगा मोठा झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात पुनरागमन करून देऊळ बंद, दुहेरी, अग्गंबाई सासूबाई, अग्गंबाई सुनबाई, भाग्य दिले तू मला या सारख्या मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले.

टॅग्स :निवेदिता सराफअशोक सराफ