Join us

जेव्हा 21 वर्षानंतरही छोट्या पडद्यावर DDLJ सिनेमातला हा सीन रिक्रीएट करण्यात येतो तेव्हा !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 3:03 PM

किंग खान शाहरुख आणि काजोल यांच्या अभिनयाने नटलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमाची जादू 21 वर्षा नंतरही कमी झालेली नाही.

यश चोप्रा दिग्दर्शित 'दिल वाले दुल्हनिया' सिनेमाने घातलेली भुरळ आजही कायम आहे. राज आणि सिमरन अर्थात किंग खान शाहरुख आणि काजोल यांच्या रोमँटिक जोडीने 21 वर्षापूर्वी निर्माण केलीली जादू आजही चित्रपट रसिकांच्या मनावर गारुड घालते आहे. किंग खान शाहरुख आणि काजोल यांच्या अभिनयाने नटलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमाची जादू 21 वर्षा नंतरही कमी झालेली नाही. याचाच प्रत्यय रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने'च्या सेटवर आला. काजोल लवकरच 'हेलिकॉप्टर एला' या सिनेमाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी काजोलने या शोमध्ये हजेरी लावली होती. 

जिथे काजोल असणार म्हटल्यावर 'दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे' सिनेमाचा उल्लेख होणार नाही हे तर अशक्यच. त्यामुळेच जेव्हा माधुरीने सांगितले की, “ शशांक खेतान सुध्दा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सिनेमाचा आणि सिमरन अर्थात काजोलचाही मोठा चाहता आहे. शशांकने डीडीएलजे सिनेमा ब-याचवेळा पाहिला आणि विशेष म्हणजे काजोलने साकारलेली सिमरनची भूमिका पाहिल्यानंतर शशांकनेही अॅक्टींग इंडस्ट्रीमध्ये करियर करण्याचे ठरविले होते. काजोलपासून प्रेरणा घेत आज तो  सिने निर्माताही बनला असल्याचे यावेळी शशांकने सांगितले.”

शशांकने काजोलला  डान्स करण्याची विनंती करताच काजोलनेही होकार देत ''मेहंदी लगाके रखना''' या गाण्यावर ठेका धरल्याचे पाहयला मिळाले. शेवटी शशांकने त्याचे लहानपणाचे स्वप्न पूर्ण केल्या बद्दल  'डान्स दिवाने' या शोचे आभारही मानले. डीडीएलजे  ही अजरामर कलाकृती छोट्या पडद्यावर साकारण्यापूर्वी सेटवर धमालमस्तीही उडाली  होती. मात्र यावेळी काजोलनेही रोमांसचे बादशाह यश चोप्रा आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आणि कलाकृती आपल्या सोबत कायम राहतील. 'दिल वाले दुल्हनिया ले जायेंग' या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या याच आठवणीना कायम उजाळा देत राहु असे सांगत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

शाहरुखच्या बहिणीची भूमिका ऑफर होताच काजोलने दिली होती अशी प्रतिक्रिया..

शाहरुख आणि काजोलच्या जोडीने 90चे दशक गाजवले होते. बॉक्स ऑफिसवर त्यांचे अनेक सिनेमा हिट झाले होते. 'बाजीगर', 'दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे', 'करन-अर्जुन', 'कुछ कुछ होता है' आणि 'कभी खुशी कभी गम'सारखे अनेक सुपरहिट सिनेमा या जोडीने दिले.   2000 मध्ये आलेल्या शाहरुख खानच्या 'जोश'मध्ये काजोलला त्याच्या बहिणीचा रोल ऑफर करण्यात आला होता. काजोल यासाठी स्पष्टपणे नकार दिला. काजोलला कोणताही प्रयोग करायचा नव्हता.  काजोलने नकार दिल्यानंतर ही भूमिका ऐश्वर्याने साकारली होती.  

टॅग्स :काजोलशाहरुख खान