सलमान खान (Salman Khan) होस्ट करत असलेला 'बिग बॉस १७' (Bigg Boss 17) हा रिअॅलिटी शोची सध्या खूप गाजतोय. हा शो आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. शोचा फिनाले सोहळा लवकरच पार पडणार आहे. या शोने सुरूवातीपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. 'बिग बॉस १७' च्या ग्रँड फिनालेच्या उत्साहासोबतच चाहतेही या सीझनच्या विजेत्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा शो कधी आणि कुठे पाहता येईल असा प्रश्न लोकांना पडला आहे आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक तपशील जाणून घेण्यासाठी ते आतुर आहेत.
'बिग बॉस १७चा ग्रँड फिनाले'ची तारीख आणि वेळ जाहीर झाली आहे. सलमान खानने होस्ट केलेल्या शोचा ग्रँड फिनाले २८ जानेवारी २०२४ रोजी म्हणजेच रविवारी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे.
ग्रँड फिनाले कधी आणि कुठे पाहायला मिळेल?जे प्रेक्षक ग्रँड फिनालेची आतुरतेने वाट पाहत आहेत, ते टेलिव्हिजन टेलिकास्ट असो किंवा ऑनलाइन स्ट्रीमिंग असो. तुम्ही ते कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर पाहू शकता. 'बिग बॉस १७' च्या फायनलिस्ट आणि टॉप-५ स्पर्धकांची घोषणा करण्यात आली आहे. अंकिता लोखंडे, मुनावर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण मशेट्टी यांच्यात ट्रॉफीसाठी लढत होणार आहे.
'बिग बॉस १७'च्या विजेत्याला मिळणार ही रक्कमजसजसा फिनाले जवळ येत आहे तसतसे बक्षीस रकमेबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. अशी चर्चा आहे की विजेत्याला मोठी रक्कम मिळू शकते, जी ३० ते ४० लाखांच्या दरम्यान असेल. 'बिग बॉस १७' च्या विजेत्याबद्दल बोलताना, मुनवर फारुकी 'बिग बॉस १७'ची ट्रॉफी घरी घेऊन जाण्याची शक्यता आहे.
स्पर्धकांना वोट कसे द्यावे?'बिग बॉस १७'च्या वोटिंग लाइन्स खुल्या आहेत. तुम्हाला तुमच्या आवडत्या स्पर्धकाला मत द्यायचे असल्यास, तुम्ही ऑनलाइन मतदान आणि एसएमएस मतदानासह अनेक मतदान प्लॅटफॉर्मद्वारे ते करू शकता.