Join us

जेव्हा कॅटरिना करते टायगरची नक्कल !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 4:36 AM

'द व्हॉईस इंडिया किड्स'मधील प्रतिभेने सलमान खान आणि कॅटरिना कैफ भारावून  गेले. या संधीचे सोने करण्यासाठी कोणत्याही स्पर्धकाने अजिबात ...

'द व्हॉईस इंडिया किड्स'मधील प्रतिभेने सलमान खान आणि कॅटरिना कैफ भारावून  गेले. या संधीचे सोने करण्यासाठी कोणत्याही स्पर्धकाने अजिबात काही कमतरता ठेवली नाही. स्पर्धकांच्या आणि प्रेक्षकांच्या मागणीनुसार, कॅटरिना कैफने तिच्या आगामी चित्रपटातील एक सीन सादर केला. मात्र या सीनमध्ये तिने झोयाऐवजी टायगरची नक्कल केली.कॅटरिना कैफसोबत त्यातील व्हिलन अबु-उस्मानची भूमिका जय भानुशालीने साकारली. अबु-उस्मानच्या या अवतारामुळे खूपच हशा पिकला. कॅटरिना कैफने यावेळी चित्रपटातील ‘अगर तुझमें दम है तो अब मुझे रोक के दिखा’ या सलमानच्या प्रसिद्ध संवादाची नक्कल केली.  कॅटरिनाच्या या नकलेनंतर सलमानने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे अधिकच मजा आली. सेटवरील सुत्रानुसार, “सलमान मजेत म्हणाला की, या चित्रपटाचा अजून एक भाग येणार आहे ज्यामध्ये टायगर (सलमान) आणि झोया दोघांची भूमिका कॅटरिनाच साकारणार आहे.” शोमधील स्पर्धकांसह चित्रपटातील प्रसिद्ध झालेल्या “स्वॅग से स्वागत” या गाण्यावर सलमान आणि कॅटरिनाने डान्सदेखील केला.ALSO RAED :   ​‘टायगर जिंदा है’मध्ये नसणार ‘हा’ एक सीन!सध्या कॅटरिना आणि सलमान ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.  हा चित्रपट टायगर व जोयाची कथा आहे आणि यात सलमान इतकीच कॅटरिनाची भूमिकाही  महत्त्वाची आहे. कॅटरिनाने या चित्रपटाला होकार दिला नसता तर कदाचित हा चित्रपट बनलाच नसता, असे अली अब्बास यावेळी म्हणाला. खरे तर अली अब्बास म्हणतो, त्यात ब-यापैकी तथ्यही आहे. कारण, या चित्रपटासाठी कॅटने प्रचंड मेहनत घेतली आहे. कॅटरिना या चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. अली अब्बासने दिलेल्या माहितीनुसार, कॅटरिनाने या चित्रपटात आयएसआय एजंटची भूमिका साकारली आहे. यासाठी कॅटने म्हणे काही रिअल लाईफ एजेंटची भेट घेतली.  या चित्रपटात ती स्पेशल डान्स करताना  दिसणार आहे. हा कॅटचा सगळ्यात धमाकेदार परफॉर्मन्स असल्याचे मानले जात आहे. तिचा डान्स पाहून चिकनी चमेली, शीला की जवानी, काला चश्मा सगळेच तुम्ही विसरून जाल. ‘टायगर जिंदा है’साठी कॅट व सलमानने  झीरो डिग्री तापमान असलेल्या ठिकाणी शूटींग केले आहे.