सुशांत सिंहचे नाव ज्या अभिनेत्रीबरोबर जोडले जाते ती म्हणजे अंकिता लोखंडे. 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवर सुशांत आणि अंकिता जवळ आले होते. जवळजवळ 6 वर्षे हे दोघे लिव्ह- इनमध्ये राहिले होते. 'पवित्र रिश्ता'नंतर 'झलक- दिखला' जा या रिअॅलिटी शोमध्येही दोघे सहभागी झाले होते. याच मंचावर सुशांतने अंकिताला प्रपोज केले होते.
प्रपोज केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री होती. झलकच्या सेटवर सुशांतने पहिल्यांदाच अशाप्रकारे आपल्या प्रेमाची जाहीर कबुलीच दिली होती.
जानेवारी 2016 मध्ये हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण काही दिवसांतच दोघांनी ब्रेकअप केल्याचे जाहिर केले होते. दोघांचे ब्रेकअप झाले तेव्हा अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते.पण दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपचे कारण समोर येऊ दिले नाही.त्यावेळी सुशांत ब्रेकअपविषयी म्हणाला होता की, लोक फक्त एकमेकांपासून दूर होतात.. आणि हे खूप दुर्दैवी असते.
अचानक सुशांतच्या निधनाची बातमी ऐकून अंकिताला मोठा धक्काला बसला.‘पवित्र रिश्ता’मध्ये सुशांतची अभिनेत्री अंकिता लोखंडेशी ब्रेकअप झाल्याचे मानले जात होते. ब्रेकअपनंतर अंकिताचा एका उद्योजकाशी साखरपुडा झाल्याच्या बातम्या होत्या.
सुशांतने अभिषेक कपूरच्या 'काय पो चे' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. पहिल्याच चित्रपटातून त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यानंतर तो शुद्ध देसी रोमान्स, पीके, ब्योमकेश बक्क्षी यांसाह अनेक चित्रपटांत झळकला होता. सुशांतने 'एमएस धोनी' आणि 'केदारनाथ'सारखे हीट चित्रपट दिले. यासोबतच आमिर खानच्या 'पीके'मधील कामाचेही कौतुक झाले. सध्या सुशांत एका चित्रपटासाठी 5-7 कोटी रुपये चार्ज करत होता. चित्रपटाशिवाय तो जाहिरात आणि शोजमधून कमाई करत होता.