Join us

चंदेरी दुनियेत अचानक कुठे गायब झाली ही मराठमोळी अभिनेत्री, सध्या काय करतेय ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 12:14 IST

मराठी चित्रपटसृष्टीत काही अभिनेत्री आहे ज्या प्रकाशझोतात आल्या पण कालांतराने गायब झाल्या. त्यानंतर पुन्हा कधीच दिसल्या नाहीत.

झगमगत्या या चंदेरी दुनियेत कित्येक जण आपले नशीब आजवण्यासाठी येतात. त्यातील काहींच्या हाती लागते यश तर काहींच्या अपयश. अशाच मराठी चित्रपटसृष्टीत काही अभिनेत्री आहे ज्या प्रकाशझोतात आल्या पण कालांतराने गायब झाल्या. त्यानंतर पुन्हा कधीच दिसल्या नाहीत. 

 किंवा लग्नानंतर परदेशात स्थायिक होतात. मराठी अभिनयसृष्टीतील अशीच एक अभिनेत्री जिने लग्नानंतर अभिनय सोडून परदेशी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

अशीच एक अभिनेत्री आहे नेहा गद्रे (Neha Gadre ) जिने सिनेइंडस्ट्रीला रामराम ठोकून नवऱ्यासह परदेशात स्थायिक झाली.. लग्नानंतर नेहा ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली.

नेहाने 'मन उधाण वाऱ्याचे' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. यानंतर तिने 'अजूनही चांद रात आहे' या मालिकेत रेवाची भूमिका केली. 'मोकळा श्वास' चित्रपटात मृण्मयी देशपांडेच्या बहिणीच्या भूमिकेत ती दिसली. तसेच 'गडबड झाली' या चित्रपटातही तिने काम केले आहे.

नेहा गद्रे हिने २ मार्च, २०१९ रोजी ईशान बापटसोबत लग्न केले. लग्नानंतर नेहा नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. यानंतर ती अभिनय क्षेत्रापासून दुरावली. मात्र तिने परदेशात राहून एका वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले. दोन वर्षे तिने अभ्यास आणि मेहनत करून डिप्लोमा इन अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन अँड केअर ही पदवी मिळवली. तिला एक गोंडस मुलगी देखील आहे. 

टॅग्स :नेहा गद्रेटिव्ही कलाकार