Join us

'आम्ही दोघी'मालिकेत आदित्य करणार का या गोष्टीचा उलगडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:37 AM

मालिकेत विवेक सांगळे आदित्यची भूमिका साकारत आहेत. मालिकेत सध्या प्रेक्षकांनी पाहिलं की मीराने अक्षयशी लग्नासाठी होकार दिला असून त्यांच्या साखरपुडा लवकरच होणार आहे. पण आदित्यला मात्र हे अक्षय मीरासाठी योग्य वाटत नाही आहे तसेच तो काहीतरी लपवत अशी शंका आदित्यला आहे.

'आम्ही दोघी मालिके'चं कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे. मालिकेत विवेक सांगळे आदित्यची भूमिका साकारत आहेत. मालिकेत सध्या प्रेक्षकांनी पाहिलं की मीराने अक्षयशी लग्नासाठी होकार दिला असून त्यांच्या साखरपुडा लवकरच होणार आहे. पण आदित्यला मात्र हे अक्षय मीरासाठी योग्य वाटत नाही आहे तसेच तो काहीतरी लपवत अशी शंका आदित्यला आहे.

मीरा आणि अक्षय विवाहबंधनात अडकण्याआधी एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. मीरा अक्षय आणि त्याच्या मित्रांसोबत रात्री जेवायला बाहेर जाते आणि तेथे त्यांच्या सोबत तिला अस्वस्थ वाटतं.जेवणाच्या टेबलवर वेटर मीराला व्हिस्कीचा ग्लास देतो आणि अक्षय तिला तो प्यायला सांगतो. मीरा दारू प्यायला नकार देते आणि त्यामुळे अक्षय संतापतो आणि त्याच्या मित्रांसमोर तिच्या वर ओरडू लागतो. 

साखरपुड्यासाठी अंगठी घेण्यासाठी मीरा आणि अक्षय सोनाराच्या दुकानात गेले असताना अक्षय त्यांनी ठरल्यापेक्षा पेक्षा जास्त दागिन्यांची मागणी करतो. येथेच आदित्यच्या मनात अक्षय मीरासाठी योग्य नाही असे विचार येऊ लागतात. त्याच्या हास्यास्पद आणि लोभी वर्तनामुळे सर्व कुटुंबाला या लग्नात काहीतरी चुकते आहे असे वाटू लागते. अक्षयशी विवाह करण्यापासून आदित्य मीराला वाचवू शकेल का? मीरा हे लग्न मोडेल का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

नुकतंच मालिकेचं शीर्षक गीताच्या शूटिंग दरम्यान शिवानी बसमध्ये चढत असताना ती पडली आणि तिला दुखापत देखील झाली. तिला झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण युनिटने शूटींग थांबवण्याचा निर्णय घेतला पण शिवानीने तसं होऊ दिलं नाही. तिने सेटवरतीच प्रथमोपचार करून घेतले आणि दिग्दर्शकाला पुन्हा शूटिंग सुरु करायला सांगितले. या दुखापतीमुळे तिच्या उजवं पाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांध्याला इजा झाली आहे पण तिने चित्रीकरण न थांबवता तिचं काम पूर्ण केलं. तिचा हा स्वभाव आणि काम पूर्ण करण्याची जिद्द अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे.