Join us

कौन है? च्या चित्रीकरणानंतर चारू असोपा रात्री झोपलीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 15:31 IST

कलर्सच्या कौन है?मधील लोकांना आढळून येणाऱ्या अमानवी, अलौकिक आणि रहस्यमय घटना असणाऱ्या भयानक कथांनी प्रेक्षकांना आकर्षित केले आहे

कलर्सच्या कौन है?मधील लोकांना आढळून येणाऱ्या अमानवी, अलौकिक आणि रहस्यमय घटना असणाऱ्या भयानक कथांनी प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. या आठवड्यातील अशीच अजून एक सादर केली जाणारी नाइट शिफ्ट ही कथा प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणार आहे. या एपिसोड मध्ये लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री चारू असोपा दिसणार आहे.

नाइट शिफ्ट या कथेत वलेचा(वनाब खान) या कारखाना मालकाची कथा सांगीतलेली आहे ज्याने नाइट शिफ्ट विभाग त्या जागेत भूत आहे अशा वदंते मुळे बंद केला आहे. पण, 2 वर्षांनंतर, वलेचा पुन्हा एकदा नाइट शिफ्ट चालू करण्यासाठी मान्यता देतो कारण प्रवेश या त्याच्या कारखान्यातील कामगारामुळे. प्रवेशने रात्रपाळी सुरू केल्यावर लगेच त्याला येणाऱ्या अनुभवांचा धक्का बसतो आणि तो त्या भूता पासून मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न करतो.

रिचाची(वलेचाची बायको) भूमिका करणारी चारू असोपा म्हणाली, “ पुन्हा एकदा भयपटात काम करण्याचे कारण आहे नाइट शिफ्टची आकर्षक कथा. कौन है? च्या चित्रीकरणानंतर, विशेषतः त्या रात्री मी नीट झोपू शकले नाही. मी त्या कथे बद्दल आणि त्या सीन विषयी विचार करणे थांबवू शकले नाही, ते माझ्या मनात सतत येत राहिले. एका सीन मध्ये मला मृत्यु पावल्याचा अभिनय करायचा होता आणि नेमके त्याच वेळी माझ्या शेजारी असलेल्या फोनची घंटी वाजली, त्या सीन नंतर मी थोड्या वेळासाठी संभ्रमित झाले होते. असो, पण मी एक अभिनेत्री आहे. तथापि, शोच्या चिक्त्रीकरणाचा मी आनंद घेतला आणि मला वाटते की प्रेक्षकांना सुध्दा हा एपिसोड आवडेल!”