Join us

कोण आहे मुग्धा चाफेकर? मराठमोळ्या पद्धतीने थाटामाटात केलं लग्न; ९ वर्षांनी घेतेय घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 18:05 IST

कोणकोणत्या मराठी मालिका, सिनेमांमध्ये झळकली अभिनेत्री? वाचा..

मनोरंजनसृष्टीत अधूनमधून अनेक जोड्या विभक्त होतात. बऱ्याच सेलिब्रिटींचा घटस्फोट झाल्याचं आपल्या वाचनात येतं. नुकतंच मराठी अभिनेत्री मुग्धा चाफेकरनेही (Mugdha Chaphekar) घटस्फोट जाहीर केला आहे. पती रवीश देसाईसोबत (Ravish Desai) ती लग्नानंतर ९ वर्षांनी विभक्त होत आहे. तिच्या पतीनेच सोशल मीडियावर पोस्ट करत घटस्फोट जाहीर केला. मुग्धा चाफेकरने मराठी तसंच हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. मुग्धा चाफेकरबद्दल जाणून घेऊया.

मुग्धा चाफेकरचा जन्म २४ मार्च १९८७ रोजी झाला. २००१ साली तिने 'आजमाइश' हिंदी सिनेमातून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. 'ज्युनिअर जी' या मालिकेत ती 'शेली' भूमिकेत झळकली. २००६ साली तिने 'त्या मुझसे दोस्ती करोगे' या हिंदी मालिकेतून मुख्य अभिनेत्री म्हणून सुरुवात केली. नंतर ती 'धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान' मालिकेत राजकुमारी संयोगिताच्या भूमिकेत दिसली. यातून तिला लोकप्रियता मिळाली. यापाठोपाठ 'धरम वीर','मेरे घर आयी एक नन्ही परी','सजन रे झूठ मत बोलो','गोलमाल है भाई सब गोलमाल है' मालिकेत तिने काम केलं. नुकतीच ती 'कुमकुम भाग्य' मालिकेत दिसली.

रवीश देसाईशी भेट

२०१४ साली मुग्धा 'सप्तरंगी ससुराल' मध्ये झळकली. यामध्ये तिच्यासोबत रवीश देसाई मुख्य भूमिकेत होता. दोघांची ओळख झाली, नंतर प्रेम फुललं आणि २०१६ साली त्यांनी लग्न केलं. मुग्धा आणि रविशचे लग्न मुंबईत महाराष्ट्रीयन पद्धतीने झाले. लग्नात मुग्धाने पिवळ्या रंगाची नववारी तर रविशने क्रीम रंगाचा कुर्ता घातला होता. मुग्धा नववारी साडीत खूपच छान दिसत होती. तिने लग्नात एखाद्या मराठी वधूप्रमाणे साजशृंगार केला होता. तिने नाकात नथ घातली होती. तसेच केसात गजरा माळला होता.  

मराठीतही केलंय काम

मुग्धा चाफेकरने २०१८ मध्ये 'गुलमोहर' या मराठी मालिकेतून मराठी टेलिव्हिजनविश्वात पदार्पण केलं. यामध्ये ती आरोह वेलणकरसोबत झळकली. नंतर २०२२ मध्ये तिचे 'रुप नगर के चिते' आणि 'जेता' हे दोन मराठी सिनेमे आले. 

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारघटस्फोटलग्न